'पुण्याची टॉकरवडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा

Amruta Deshmukh and Prasad Jawade Engagement: सध्या चर्चा आहे ती म्हणजे एका गोड जोडप्याची. यावेळी त्यांनी आपली रिलेशनशिप जाहीर केली आहे. त्यांनी यावेळी गुपचूप साखरपुडा उरकला असून यावेळी त्यांनी आपल्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 22, 2023, 06:37 PM IST
 'पुण्याची टॉकरवडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा title=
July 22, 2023 | actress amruta deshkmukh and prasad jawade offically engaged share photos declared marriage date

Amruta Deshmukh and Prasad Jawade: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका लोकप्रिय अभिनेत्रीची. तिनं गुपचूप साखरपुडा उरकला आहे. त्यांची ओळख एका रिएलिटी शोमध्ये झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. सोबतच त्यांच्या या नव्या बहरलेल्या नात्यामुळे त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून यावेळी त्यांनी आपल्या लग्नाची तारीखही जाहीर करून टाकली आहे. हे दोघंही कलाकार सध्या आपल्या या फोटोंमुळे आणि गुडन्यूजमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. त्यातून यावेळी त्यांच्या या फोटोंवर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या जोडप्यावर सध्या चाहत्यांनीही प्रेमाचा वर्षाव केला आहे. यावेळी त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर काही तासांच व्हायरल झाले आहेत. शेवटी त्यांनी गोड बातमी दिलीच अशी चाहत्यांची भावना आहे. 

हे कपल दुसरं तिसरं कोणी नसून बिग बॉस मराठीमधील प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख हे आहे. या दोघांनी गुपचूप साखरपुडा केला असून त्यांचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले आहेत. त्यांनी यावेळी आपल्या लग्नाची तारीख जाहीर करून टाकली आहे. त्यामुळे सध्या त्या दोघांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. सोशल मीडियावर त्यांनी जाहीर केलेल्या या गुडन्यूजमुळे सोशल मीडियावर फक्त चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. यावेळी अमृतानं आणि प्रसादनं सुंदर असे गुलाबी रंगाचे कपडे घातले होते. त्यांनी यावेळी रोमॅण्टिक पोझही दिल्या होत्या. त्यांच्या या पोस्टनं सगळीकडेच चाहत्यांना आश्चर्याचा धक्काही दिला आहे. ते दोघं यावेळी एकमेकांच्या जवळ होते आणि त्यांनी यावेळी दिलेल्या पोझनं त्यांच्या चाहत्यांनी मनं त्यांनी जिंकून घेतले आहे. 

हेही वाचा - हॉलिवूड कपलचं गेट वे ऑफ इंडियासमोर Liplock, फोटो व्हायरल

''आम्ही साखरपुडा केला आहे. आम्ही दोघांनीही आयुष्यभर एकत्र एका 'टीम'मध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे तसेच आता आमच्या मार्गात येणारे कोणतेही कार्य पार पाडण्यास आम्ही सज्ज आहोत'', असंं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे त्यांचा हा फोटो व्हायरल झाला आहे. सोबतच यावेळी त्यांनी आपल्या अंगठ्याही दाखवल्या आहेत. यावेळी त्यांची ही पोझ पाहून चाहत्यांना काय बोलू काय नको असे झाले आहे. त्यातून आता त्यांच्या या फोटोकडे पाहून काही लोकं आपल्या पार्टनरच्या पुन्हा प्रेमातही पडण्याच्या तयारीत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

‘तुमचं आमचं सेम असतं’, ‘फ्रेशर्स’, ‘देवा शप्पथ’, ‘मी तुझीच रे’, ‘आठशे खिडक्या नऊशे दार’ अशा मालिकांतून अमृता देशमुखनं अभिनय केला आहे. ती रेडिओ जॉकीही आहे. तिचे टिकटॉक व्हिडीओही अनेकदा व्हायरल झाला आहेत. सोबतच प्रसाद हा 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'कन्यादान', 'अरूंधती' अशा अनेक मालिकांतून तसेच मराठी चित्रपटांतून समोर आला आहे. त्यानं हिंदी चित्रपटांतूनही कामं केली आहेत. यावर्षी 18 नोव्हेंबरला ते दोघं विवाहबंधानात अडकणार आहेत.