दबंग-3 मध्ये झळकणार ही अभिनेत्री, सोनाक्षीचा पत्ता कट

बॉलिवुडचा दबंग सलमान खान सध्या टायगर जिंदा है सिनेमामधून जबरदस्त कमाई करत आहे. सिनेमाने ४ दिवसातच १५० कोटीचा आकडा पार केला आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 26, 2017, 04:28 PM IST
दबंग-3 मध्ये झळकणार ही अभिनेत्री, सोनाक्षीचा पत्ता कट title=

मुंबई : बॉलिवुडचा दबंग सलमान खान सध्या टायगर जिंदा है सिनेमामधून जबरदस्त कमाई करत आहे. सिनेमाने ४ दिवसातच १५० कोटीचा आकडा पार केला आहे. 

सलमानकडे अजून रेस 3 आणि भारत यासारखे सिनेमे देखील आहेत. रेस-3 पुढच्या वर्षी म्हणजेच २०१८ मध्ये ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. तर भारत २०१९ मधल्या ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. या सोबतच आता दबंग ३ च्या देखील चर्चा आहेत. 

सिनेमात सलमानसोबत कोणती अभिनेत्री काम करणार आहे. याबाबत चर्चा आहेत. सोनाक्षी सिन्हाचं नाव आधी चर्चेत होतं. पण आता सलमानची फेव्हरेट नागिनने सोनाक्षीचा पत्ता कापला आहे. दबंग 3 मध्ये मौनी रॉय दिसणार आहे. मौनी दबंगच्या तिसऱ्या सिरीजमध्ये काम करणार आहे.

सलमान सध्या मौनीवर खूपच खूश आहे. बिग बॉसमध्ये मौनी सोबत सलमानने स्क्रीन शेअर केली आहे. त्यामुळे आता मौनीला सिनेमात काम करण्याची संधी मिळते का हे पाहावं लागेल.