मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सोशल मीडियावर सध्या भलताच चर्चेत आला आहे. विशेष असे की, तो कोणत्या चित्रपट किंवा वादामुळे चर्चेत नाही. तर, मेक्सिकोमध्ये सुरू असलेल्या एका 'गे' बारच्या जाहिरातीमुळे. घडला प्रकार पाहून तुम्हालाही धक्का बसू शकतो.
आपल्या दुकानाच्या बोर्डवर अभिनेता, अभिनेत्रींचे फोटो लाऊन व्यवसाय करणे हे आपल्याकडे मुळीच नवे नाही. आपल्याकडे ज्वेलर्स, केशकर्तनालय, पार्लर आदी दुकानांवर, छोट्या जाहीरातींमधून अभिनेते, अभिनेत्रींचे फोटो बिनदिक्कतपणे झळकवले जातात. यासाठी या मंडळींची कोणतीही पूर्वपरवानगी घेणेय या दुकानदारांना आवश्यक वाटत नाही. पण, विशेष असे की, मेक्सिकोतही चक्क असाच प्रकार पहायला मिळाला असून, इथे तर, चक्क बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याचा फोटो लाऊन 'गे' बारची जाहीरात केली जात आहे. सोशल मीडियावर याबाबतचा फोटोही व्हायरल झाला आहे. या फोटोमुळेच जॉन सध्या चर्चेत आहे. महत्त्वाचे असे की, जॉन अब्राहमचा फोटो अगदी सांगेतीक पद्धतीने लावण्यात आला आहे.
Super curious if John Abraham knows they are using his image to promote gay cruises in Mexico. #Dostana pic.twitter.com/swURiDX793
— Nia Levy King (@ArtActivistNia) December 24, 2017
दरम्यान, या 'गे' बारची जाहीरात करताना जॉन अब्राहमचा फोटो लावल्याची एक जाहिरात एका व्यक्तीच्या नजरेस पडली. या व्यक्तिने त्या जाहीरातीचा फोटो काढू तो ट्विटरवर शेअर केला. तसेच, फोटोखाली लिहीले की, 'मला कल्पना नाही, जॉन अब्राहमला याची माहिती आहे का की, त्याचा फोटो मेक्सिकोतील 'गे' क्रुजला प्रमोट करण्यासाठी वापरले जात आहेत.'