'बीग बीं'पासून 'दिल बेचारा'पर्यंत 'या' ट्वीट्सची २०२० मध्ये चर्चा, जाणून घ्या

'दिस हॅपन्न २०२०' या ट्विटरच्या रिपोर्टनुसार भारतात २०२० च्या टॉप एंटरटेन्मेंट ट्वीट्सची यादी

Updated: Dec 8, 2020, 05:41 PM IST
'बीग बीं'पासून 'दिल बेचारा'पर्यंत 'या' ट्वीट्सची २०२० मध्ये चर्चा, जाणून घ्या title=

नवी दिल्ली : २०२० या वर्षात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) चा अभिनय असलेला सिनेमा 'दिल बेचारा' (Dil Bechara)च्या नावाची सर्वाधिक ट्वीट झाली. टेलिव्हिजनबद्दल बोलायचं झालं तर रिएलिटी शो बिग बॉस (Bigg Boss)सर्वाधिक हॉट टॉपिक ठरला. 'दिस हॅपन्न २०२०' या ट्विटरच्या रिपोर्टनुसार भारतात २०२० च्या टॉप एंटरटेन्मेंट ट्वीट्समध्ये अमिताभ बच्चन, विजय आमि दिवंगत हॉलिवूड स्टार चॅंडविक बोसमॅन (Chadwick Boseman)यांची नावे आहेत.

'दिल बेचारा' टॉपवर

सुशांत सिंग राजपूतचा 'दिल बेचारा' (Dil Bechara) हा सिनेमा ट्वीटर टॉपमध्ये चर्चेत राहीला. टेलीव्हजन शोजम आणि वेबबद्दल सांगायचं झाल्यास 'बिग बॉस' (Bigg Boss) आणि 'मिर्झापूर 2' (Mirzapur 2) यादीत वरच्या स्थानी आहेत. 

इंटरनॅशनल वेब सिरीजमध्ये ट्वीटरवर सर्वाधिक चर्चा मनी हाइस्ट (Money Heist)ची झाली. भारतीय मनोरंजन क्षेत्रात विजयने आपल्या फॅन्ससोबत फेब्रुवारीत घेतलेल्या सेल्फीची ट्वीटरवर अधिक चर्चा आणि रिट्वीट झाले.

अमिताभ यांचे ट्वीट 

आपण कोरोना व्हायरसने संक्रमित झाल्याचे ट्वीट जुलैमध्ये बिग बी अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan)यांनी केलं होतं. त्यांचे हे ट्वीट सर्वाधिक रिट्वीट झाले असून 'ट्वीट ऑफ द ईयर' ठरलंय. 

'ब्लॅक पॅंथर' (Black Panther) स्टार बोसमैनचे वयाच्या ४३ व्या वर्षी ऑगस्टमध्ये कॅन्सरमुळे निधन झाले. ते चार वर्षे या आजाराशी झूंजत होते. त्यांच्या निधनानंतर जगभरातून ट्वीट करण्यात आले. भारतातून सर्वाधिक रिट्वीट्स, सर्वाधिक लाईक केला गेलेला 'ट्वीट ऑफ इंडीया' ठरलाय.