'अग्निहोत्र 2' मालिकेची पहिली झलक

25 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला 

Updated: Nov 16, 2019, 12:23 PM IST
'अग्निहोत्र 2' मालिकेची पहिली झलक  title=

मुंबई : 10 वर्षांपूर्वी लोकप्रिय ठरलेली 'अग्निहोत्र' ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2 डिसेंबरपासून ही मालिका सुरू होत असून या मालिकेची पहिली झलक समोर आली आहे. अभिनेता शरद पोंक्षेंनी याचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

शरद पोंक्षे 'अग्निहोत्र' मालिकेत महादेवची व्यक्तिरेखा साकारत आहेत. जे वाड्यापासून दूर राहिलेल्या अग्निहोत्री कुटुंबियांची वाट पाहत असतात. 'कुणी येईल का रे उत्तर घेऊन' असा प्रश्न महादेव गजाननाला विचारत आहेत.कित्येक वर्ष महादेव वाड्यात एकटाच राहतो. वाडा, आठ गणपती आणि त्याभोवती फिरणाऱ्या कथानकातून एकत्र आलेल्या अग्निहोत्रींच्या तीन पिढ्या प्रत्येकाला गूढत्वाकडे घेऊन गेल्या. या मालिकेने एक इतिहास रचला आहे आणि आता पुन्हा एकदा नवा इतिहास रचण्यासाठी ही मालिका रुपेरी पडद्यावर येत आहे. 

अग्निहोत्र 2 मध्ये मालिका पुढे सरकरत आहे. अग्निहोत्र कुटुंबियांची पुढची पिढी या वाड्याकडे वळते का? हा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. मालिकेच्या पहिल्या झलकमध्ये अभिनेत्री रश्मी अनपट, अनुराधा राजाध्यक्ष, राजन भिसे हे कलाकार दिसत आहेत.

2008 मध्ये देखील ही मालिका नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित झाली होती. आता 10 वर्षांनी ही मालिका 2019 मध्ये 2 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. अग्निहोत्र’ मालिकेच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच याही पर्वाचे कथानक श्रीरंग गोडबोले यांनी लिहिले असून ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख दिग्दर्शक सतीश राजवाडे स्वत: या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत.  प्रेक्षकांमध्ये मालिकेबाबत खूप उत्सुकता पाहायला मिळत आहे.