मुंबई : अनुष्का शर्मा, सोनम कपूरच्या लग्नानंतर दीपिका पदुकोणच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार दीपिका - रणवीर सिंहच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. या दोघांच लग्न 20 नोव्हेंबर रोजी यांच लग्न इटलीमध्ये होत आहे. मात्र अनुष्का, सोनम कपूरच्या लग्नानंतर दीपिका पदुकोण एक मोठा धडा शिकली आहे. आणि यासाठी तिने खास तयारी केली आहे.
दीपिका आपल्या लग्नसोहळ्याला खास करू इच्छिते. तसेच तिला आपलं लग्न अगदी खाजगी ठेवायचं आहे. डीएनएने दिलेल्या माहितीनुसार, दीपिका आणि रणवीरने असा निर्णय घेतला आहे की, लग्नात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला एख खास विनंती केली आहे. लग्नाला येणाऱ्या प्रत्येकाने मोबाइल आणि कॅमेरा आणू नये अशी खास विनंती केली आहे. आपल्याला माहितच आहे अनुष्का शर्मा - विराट कोहलीच्या लग्नाचे फोटो अगदी लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. प्रत्येक कलाकाराला आपलं लग्न हे अतिशय खाजगी ठेवायचं असतं. पण फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे ते लग्न खाजगी राहत नाही. त्यामुळे दीपिका - रणवीर यांनी हा निर्णय घेतला आहे.
दीपिकाची अजिबात इच्छा नाही की, तिच्या लग्नातील कोणतेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हावेत. यासाठी त्यांनी खास सुरक्षेचा देखील वापर केला आहे. दीपिका आणि रणवीर यांना स्वतःला त्यांच्या लग्नातले फोटो शेअर करायचे आहेत. अनुष्काप्रमाणेच सोनम कपूरच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याबाबत सोनमने आपण याबाबत नाराज असल्याचं देखील म्हटलं होतं. दीपिका आणि रणवीरच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच लग्न 20 नोव्हेंबर रोजी ठरल आहे. इटलीच्या लेक कोमो येथे हे लग्न ठरवण्यात आलं आहे. या लग्नाला फक्त 30 लोकांना आमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये अगदी जवळचे नातेवाईक आणि मित्र सहभागी असणार आहेत.