ऋषी कपूर यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची भावूक पोस्ट

एक ‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं!

Updated: Apr 30, 2020, 02:13 PM IST
ऋषी कपूर यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची भावूक पोस्ट title=

 मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. ऋषी कपूर यांच्या निधनाने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. आपल्या दर्जेदार अभिनयाने त्यांनी तब्बल पाच दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. सोशल मीडियावर परखडपणे मतं मांडण्यासाठीही ऋषी कपूर प्रसिद्ध होते. त्यामुळे ऋषी कपूर यांचा चाहतावर्ग हा केवळ चित्रपटसृष्टीपुरताच मर्यादित नव्हता. 

ऋषी कपूर यांचे शब्द दुर्दैवाने खरे ठरणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऋषी कपूर यांच्या यांच्या निधनानंतर एक भावूक पोस्ट केली आहे. यामध्ये राज यांनी एक ‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज यांनी अत्यंत ह्रद्यस्पर्शी शब्दांत ऋषी कपूर यांच्याविषयीच्या भावना फेसबूक पोस्टमध्ये मांडल्या आहेत. 

'मी उध्वस्त झालोय'; लाडक्या 'अकबर'च्या एक्झिटने बिग बींना हादरा

ऋषी कपूर ह्यांच्याशी माझा कौटुंबिक स्नेह होता. अर्थात त्यांच्या अभिनयाचा आणि स्पष्टवक्तेपणाचा मी चाहता होतो. जे मनात तेच ओठावर आणि तेच ‘ट्विटर’वर असा त्यांचा खाक्या होता. त्यांच्या एखाद्या ‘ट्वीट’वर कितीही वादंग माजलं  तरी ते मागे हटायचे नाहीत तसंच एखाद्या विषयावर भूमिका घ्यायला घाबरायचे नाहीत, असे राज यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.