'आपली संस्कृती...', बिकिनीमधील फोटो शेअर करत Mitali Mayekar नं नेटकऱ्यांना सुनावले खडे बोल

Mitali Mayekar : मिताली मयेकरनं सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत मितालीनं बिकिनी परिधान केली असून ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मिताली मयेकरच्या पोस्टवर कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: May 19, 2023, 12:03 PM IST
'आपली संस्कृती...', बिकिनीमधील फोटो शेअर करत Mitali Mayekar नं नेटकऱ्यांना सुनावले खडे बोल title=
(Photo Credit : Mitali Mayekar Insatgram)

Mitali Mayekar : मराठमोळा लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची पत्नी मिताली मयेकर ही नेहमीच चर्चेत असते. त्या दोघांची जोडी ही लोकप्रिय आहे. सिद्धार्थ आणि मिताली दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. ते दोघेही बऱ्याचवेळा एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतात.  सध्या ते दोघेही स्पेनमध्ये त्यांच्या सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण सगळ्यांचे लक्ष हे मितालीनं शेअर केलेल्या एका फोटो आणि तिनं दिलेल्या कॅप्शननं वेधले आहे. 

मितालीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत मितालीनं फ्लोरल बिकिनी परिधान केली आहे. मिताली समुद्र किनारी आहे. तर या फोटोत मितालीचा हॉट अंदाज सगळ्यांना पाहायला मिळत आहे. या फोटोत मितालीचा अंदाज पाहून अनेक चाहते घायाळ झाले आहेत. मितालीनं तिच्या बिकिनीतील शेअर करत दिलेल्या कॅप्शननं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या फोटोत मिताली म्हणाली, 'आज सकाळी उठून मी कॉन्ट्रोव्हर्सीला निवडलं. कमेंट सेक्शनमध्ये आपली संस्कृती याबाबत ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला स्वत:ची लाज वाटेल.' 

हेही वाचा : प्रेग्नंसी दरम्यान Deepika Kakar 'या' गंभीर व्याधीची शिकार, VIDEO शेअर करत केला खुलासा

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मितालीचा हा फोटो पाहता त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'मराठी मुलीनं असं काही केलं की तिला नाव ठेवणारे आणि संस्कृतीची लाज काढणारे सनी लिओनीला रात्री गुपचुप चादरी आड बघत असते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'पाण्याची वाफ झालीस, हॉट दिसतेस.' तिसरा नेटकरी म्हणाला, काही नाही घातलं तरी आमचं काय जाणार आहे ...? ती तुझी आवड आणि निवड आहे... बाकी महाराष्ट्राच्या संस्कृतीच आणि तुझं काही देणंघेणं नाही हे तर पोस्ट वरून सिद्ध झालंच ...' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'आपली नाही...तुझी तुझी संस्कृती.' दुसरा नेटकरी म्हणाला, असे कपडे घालायला संस्कृती नाही तर फिगर लागते... ज्याच्याकडे अशी फिगर नसते ते म्हणजे ट्रोल करणारे... त्यांनी खूप सुंदर मराठमोळ्या पद्धतीनं लग्न केलं तेव्हा कोणी कमेंट केली नाही की छान संस्कृती जपली.'  तिसरा नेटकरी म्हणाला, 'ते नव्हं आपला मराठी गान टाकल असत तरी चाल असत गडूलाच पाणी कशाला ढवलील नागाच्या पिलाला तू का गं खवलील.......