ट्रॉम क्रूजचा 'मिशन इम्पॉसिबल फॉलआऊट' येतोय

फॉलआऊटचा एका सीन शूट करताना तर टॉम क्रूझला गंभीर दुखापतही झाली होती...

Updated: Jul 27, 2018, 11:03 AM IST
ट्रॉम क्रूजचा 'मिशन इम्पॉसिबल फॉलआऊट' येतोय title=

कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई : 'मिशन इम्पॉसिबल' सिरीजचा नवा सिनेमा 'मिशन इम्पॉसिबल फॉलआऊट'ची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. टॉम क्रूज या सिनेमात पुन्हा एकदा जबरदस्त एक्शनसीन्स करताना दिसणार आहे. जगात काहीच अशक्य नाही असं ठाम मत असणाऱ्या या जिगरबाज डिटेक्टिव्हची पुन्हा बिग स्क्रीनवर एन्ट्री होतेय... होय तो परत आलाय... आम्ही बोलतोय 'ईथन बंट' अर्थातच टॉम क्रूजबद्दल... 'मिशन इम्पॉसिबल'चा पुढचा सिक्वल फॉलआऊट प्रदर्शित होतोय. टॉम क्रूजच्या या सिनेमातही नेहमी प्रमाणे थक्क करणारे स्टंट्स आणि जबरदस्त एक्शन बघायला मिळणार आहे. 'फॉलआऊट'मध्ये जरा जास्तचं जबरदस्त एक्शनची ट्रीट रसिकांना बघायला मिळणार आहे. 

१९९६ सालापासून 'मिशन इम्पॉसिबल' सीरिजची सुरुवात झाली. १९९६ सालापासून सुरु झालेला हा प्रवास आज २२ वर्षांनीही सुरु आहे. २२ वर्षांमध्ये आलेल्या सहाही भागांमध्ये टॉम क्रूजचं प्रमुख भूमिकेत झळकतोय हे विशेष... मात्र, टॉम आजही तितकाच फ्रेश आणि चपळ वाटतोय. स्टंट् करताना नवोदित कलाकारांना लाजवेल असा टॉमचा सळसळता उत्साह अजूनही कायम आहे.

मिशन इम्पॉसिबल एक, दोन आणि तीन असो वा 'मिशन इम्पॉसिबल घोस्ट प्रोटोकॉल' असो वा 'मिशन इम्पॉसिबल रॉग नेशन' असो, टॉम क्रूजची जबरदस्त अदाकारी सगळ्याच भागांमध्ये बघायला मिळाली.

फॉलआऊटचा एका सीन शूट करताना तर टॉम क्रूझला गंभीर दुखापतही झाली होती. पण, एवढी मोठी दुखापत होऊनही टॉमनं हार मानली नाही आणि सिनेमाचं शूट सुरुचं ठेवलं. त्यामुळे खरंच टॉम क्रूजसाठी काहीच इम्पॉसिबल नाही असंच म्हणावं लागेल. वेल आता मिशन इम्पॉसिबलच्या इतर भागांप्रमाणे फॉलऑऊटही बॉक्स ऑफिसवर धमाका करेल, अशी आशा करायला हरकत नाही.