VIDEO : मिलिंद सोमणची आईही 'fitness freak'

मातृदिनी मिलिंद सोमणने आईसोबतचा 'हा' व्हिडिओ शेअर केला आहे.

Updated: May 13, 2019, 09:09 AM IST
 VIDEO : मिलिंद सोमणची आईही 'fitness freak' title=

मुंबई : मॉडलिंगमधून आपल्या करियरची सुरुवात करणारा अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. मिलिंदच नाही तर मिलिंदची आई उषा सोमण याही वयाच्या ८०व्या वर्षातही अतिशय अॅक्टिव्ह आहे. मिलिंद सोमणने मातृदिनी त्याच्या आणि आईचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मिलिंद आणि त्याची आई पुश-अप्स करताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये मिलिंद आणि उषा सोमण समुद्रकिनारी पुश अप्स करताना दिसत आहेत. 'कोणत्याही गोष्टीसाठी कधीही खूप उशीर झालेला नसतो. उषा सोमण...माझी आई...८० वर्षांची तरुण...आपली आई आणि इतर सर्वांची काळजी घेते, पण अनेकदा स्वत:ची काळजी घेण्याकडे लक्ष देत नाही. आपल्या आईला तिच्या स्वत:साठी काही वेळ काढण्यासाठी प्रोत्साहित करा. प्रत्येक दिवसाला मदर्स डे बनवा' असं कॅप्शनही त्याने व्हिडिओला दिला आहे.

'हा व्हिडिओ सर्व मातांसाठी आहे. प्रत्येक आईने स्वत:साठी पाच मिनिटं, दहा मिनिटं तरी वेळ काढा. आम्हाला सगळ्यांना तुम्हाला सुपरफिट पाहायचं आहे.' असंही देखील त्याने व्हिडिओत म्हटलं आहे. 

मिलिंद सोमण गेल्या वर्षी त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला होता. मिलिंद सोमण ५३ वर्षांचा असून गेल्या वर्षी त्याने त्याच्यापेक्षा २८ वर्ष लहान असलेल्या अंकिता कोनवारशी लग्न केलं. या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चेमुळे अनेकांकडून त्यांना ट्रोल केलं गेलं होतं. मिलिंद सोमणचं हे दुसरं लग्न आहे. याआधी त्याने २००६ मध्ये अभिनेत्री मिलिन जॅपनोईशी लग्न केलं होतं. परंतु लग्नानंतर ३ वर्षांतच त्यांचा घटस्फोट होऊन ते वेगळे झाले.