कोरोना झाला असला तरी मिलिंद सोमणची पत्नीसोबत रंगांची उधळण

अंकिता आणि मिलिंदचे होळीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.   

Updated: Mar 30, 2021, 07:16 PM IST
कोरोना झाला असला तरी मिलिंद सोमणची पत्नीसोबत रंगांची उधळण title=

मुंबई : होळी हा सण प्रत्येकाच्या आवडीचा आहे. या खास दिवशी सर्वत्र रंगांची उधळण होते. पण नेहमी जसा रंगांचा सण साजरा होतो. गेल्या वर्षापासून मात्र सर्वच सणांवर कोरोनाचं सावटं आहे. सध्या सर्व नियमांचं पालन करत सर्व सण साजरे होत आहेत. अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणने देखील होळी सण साजरा केला आहे. मिलिंदला कोरोना झाला असून देखील तो होळी साजरी करण्यास विसरला नाही. पीपीई कीट घालून होळी साजरी करतानाचे त्याचे आणि पत्नी अंकिताचे (Ankita Konwar) फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

अंकिता आणि मिलिंदचे होळीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यांनी सुरक्षेची पूर्ण काळजी घेत होळी साजरी केली. होळीचे फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये 'मला इतका राग यायला नको, कारण अंकिता माझ्यासाठी अंबा घेवून आली.आम्हा दोघांनाही मिठी मारणे शक्य नव्हते. मी स्वतःच्या हातानेच स्वतःला रंग लावले.. ' असं लिहीलं आहे. 

शिवाय त्याने आंबे देखील खाल्ले पण कोरोना असल्यामुळे त्याला आंब्यांचा वास घेता आला नाही. त्याने 6 हापूस आंबे खाल्ले, जे अतिशय चवदार होते. मिलिंदने कोरोना झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. सध्या तो त्याच्या घरी क्वारंटाईन आहे.