'दहा वर्षानंतर लालबागच्या राजाच्या...', मिलिंद गवळी यांनी शेअर केला दर्शनाचा खास अनुभव

मिलिंद गवळी यांची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Updated: Sep 5, 2022, 06:53 PM IST
'दहा वर्षानंतर लालबागच्या राजाच्या...', मिलिंद गवळी यांनी शेअर केला दर्शनाचा खास अनुभव title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक असते. मालिकेतील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील अनिरुद्ध भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लालबागच्या राजाच्या दर्शनाविषयी सांगितले आहे. (Milind Gawali shared post after lalbaug cha raja darshan went viral) 

आणखी वाचा : धक्कादायक! रेल्वे ट्रॅकवर Reel Video बनवनं तरुणाला पडल महागात, पाहा Viral Video

मिलिंद यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मिलिंद यांनी काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत 'गणपती बाप्पा मोरया, अनिरुद्धला खास लालबागच्या दर्शनाचे आमंत्रण आले आणि छान दर्शन ही झाले. दहा वर्षानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाचा योग आला, दहा वर्षांपूर्वी पंडित जसराज आणि मधुराआई जसराज यांच्यामुळे हा दर्शनाचा योग आला होता. बाप्पाच्या इच्छेने गोष्टी घडत असतात आणि त्याची इच्छा नसेल तर झाडाचं पान सुद्धा हालत. गणपती बाप्पा सगळ्यांचे कल्याणकर सगळ्यांना सुखी ठेव,' असे कॅप्शन मिलिंद यांनी दिले. 
आणखी वाचा : काकांकडून लैंगिक शोषण ते वेश्याव्यवसाय डिझायनरचा धक्कादायक खुलासा!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : 'चोली के पीछे क्या है'वर ठुमका धरताच काही मुलं आली आणि...; सपना चौधरीसोबत घडला अनपेक्षित प्रकार, Video Viral
दरम्यान, मिलिंद गवळी यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मिलिंद यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. चाहत्यांच्या मनात त्यांनी एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या मिलिंद गवळी हे 'आई कुठे काय करते' या मालिकेमध्ये अनिरुद्धची भूमिका साकारत आहे. त्यांची भूमिका जरी नकारात्मक असली तरी त्यांच्या अभिनयाचं चाहत्यांना नेहमीच कौतुक असल्याचं पहायला मिळतं. त्यांच्यावर नेहमीच कौतुकांचा वर्षाव होतो.(Marathi Serial)