MeToo: 'सिंटा'कडून आलोक नाथ यांचे सदस्यत्व रद्द

...तर आलोक नाथ यांच्याविरुद्ध आणखी कडक कारवाई होणार.

Updated: Nov 13, 2018, 09:38 PM IST
MeToo: 'सिंटा'कडून आलोक नाथ यांचे सदस्यत्व रद्द title=

मुंबई: सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने (सिंटा) मंगळवारी अभिनेते आलोक नाथ यांचे सदस्यत्व अनिश्चित कालावधीसाठी रद्द केले. आलोक नाथ यांना सोमवारी 'सिंटा'च्या कार्यकारी समितीपुढे हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर 'सिंटा'कडून आलोक नाथ यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. 

आता आलोक नाथ यांना १ मे रोजी होणाऱ्या सिंटाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्यावेळी उपस्थित राहण्याचा आदेश देण्यात आलाय. अन्यथा आलोक नाथ यांचे सदस्यत्व कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल, असे 'सिंटा'कडून स्पष्ट करण्यात आले. 

१९९० मधील गाजलेली मालिका 'तारा'च्या निर्मात्या विनता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. तसेच याच मालिकेत काम करणाऱ्या नवनीत निशांत यांनीदेखील आलोक नाथ यांच्या असभ्य वर्तनाचे पाढे वाचले होते. मनोरंजन विश्वात काम करणारी अभिनेत्री संध्या मृदुल हिनंदेखील आलोक नाथ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या संपूर्ण प्रकरणानंतर 'सिंटा'ने आलोक नाथ यांना नोटीस धाडली होती.