वाढदिवसाच्या दिवशी मेघा घाडगेनं दिला चाहत्यांना धक्का; अभिनेत्री रुग्णालयात दाखल

 मेघाने चाहत्यांसोबत अशी एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसत आहे.  मेघाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी हे फोटो पाहून चिंता व्यक्त केली आहे.   

Updated: Dec 11, 2023, 06:40 PM IST
वाढदिवसाच्या दिवशी मेघा घाडगेनं दिला चाहत्यांना धक्का; अभिनेत्री रुग्णालयात दाखल title=

मुंबई :  आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी लोकप्रिय अभिनेत्री मेघा घाडगे हिने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मेघा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच मेघा 'बिग बॉस मराठी ४' मध्येही दिसली होती. तिने नेहमीच आपल्या वागण्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. मात्र आता मेघाने चाहत्यांसोबत अशी एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसत आहे.  मेघाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी हे फोटो पाहून चिंता व्यक्त केली आहे.   

नुकताच मेघाने तिचा वाढदिवस साजरा केला आहे. मात्र तिचं हे बर्थडे सेलिब्रेशन थोडं वेगळं होतं. शेअर केलेल्या फोटोत अभिनेत्री हॉस्पिटमध्ये दिसत आहे. हॉस्पिटलच्या कपड्यात हाताला सलाईन आणि एका हातात केक पाहून चाहते हैराण झाले आहेत. हे फोटो शेअर करत अभिनेत्रीने या फोटोला कॅप्शन दिलं आहे की, मला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा तुम्हा सर्वांना शुभेच्छांसाठी खुप खुप धन्यवाद .. तिची ही पोस्ट अवघ्या काही वेळातच व्हायरल झाली आहे. या फोटोत तिच्यासोबत तिची फॅमेलीही दिसत आहे. अनेकांनी तिला कमेंट्सच्या माध्यमातून तुला काय झालंय असं विचारलं आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट अवघ्या काही वेळातच व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनेकांनी या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री अमृता ढोंगडेने कमेंट करत लिहिलं आहे की, हे ताई वाढदिवसाच्या शुभेच्छा लवकर बरी हो. तर अमृता देशमुखने लिहीलं आहे की, काय झालंय ताई लवकर बरी हो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा. तर अजून एकाने Tai काय jhal आजारी आहेस का असं लिहीलंय, तर अजून एकाने म्हटलंय, आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हिरव्यागार शुभेच्छा काळजी घ्या. तर अजून एकाने लिहीलंय,  आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! तब्येतीची काळजी घ्या. तर अजून एकाने लिहीलंय, वाढदिवसाच्या स्टेज भर शुभेच्छा ताई  लवकर बरी हो. अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते तिच्या या पोस्टवर करत आहेत. अभिनेत्री मेघा घाडगे हिने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी तिने खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या तिचे चाहते चांगलेच काळजीत पडले