बिग बींच्या नातीशी 'या' अभिनेत्याला करायचंय लग्न

एका मुलाखतीत केला खुलासा 

Updated: Jan 5, 2021, 02:13 PM IST
बिग बींच्या नातीशी 'या' अभिनेत्याला करायचंय लग्न  title=

मुंबई : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच त्यांच कुटुंबीयही कायम चर्चेत असतात. अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हीचा बॉलिवूडशी तसा थेट संबंध नाही. पण असं असलं तरीही श्वेता बच्चन नंदा आणि तिचे कुटुंबीय चर्चेत असता. आता श्वेताची मुलगी आणि बिग बी यांची नात नव्या नवेली चर्चेत आली आहे. नव्याचे फोटो आणि व्हिडिओ कायमच व्हायरल होत असतात. 

आता चर्चा आहे ती नव्या नवेलीच्या लग्नाची. नव्यासोबत बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्याला लग्न करायचं आहे. अभिनेत्याने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. या अभिनेत्याचं नाव आहे मिजान जाफरी. मिजान जाफरी हा बॉलिवूड अभिनेता जावेदा जाफरीचा मुलगा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Navya Naveli Nanda (@navyananda)

मिजान जाफरी आणि नव्या नंदा खूप चांगले मित्र आहेत. हे दोघं एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. काही ठिकाणी असं देखील म्हटलं जातंय की, नव्या आणि मिजान रिलेशनशिपमध्ये आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Meezaan (@meezaanj)

एका मुलाखतीत स्वतः मिजानने खुलासा केला आहे. 'मला नव्यासोबत लग्न करायचं आहे', अशी भावना त्याने व्यक्त केली होती. तसेच एका मुलाखतीत मिजानला विचारलं की, लग्न, हुक अप आणि मारण्याकरता कुणाला निवडाल? यासाठी मिजानने नव्या नवेली नंदा, सारा अली खान आणि अनन्या पांडेची निवड केली आहे. 

मिजान जाफरी आणि नव्या नवेली नंदा न्यूयॉर्कमध्ये एकत्र शिक्षण पूर्ण करत होते. २०१९ मध्ये दोघांना एका सिनेमाच्या डेटवर एकत्र पाहण्यात आले. ज्यानंतर या दोघांच नाव चर्चेत राहिलं.