सलमानच्या मागे धावलेल्या कुत्र्याची मुलाखत (व्हिडिओ)

पाहा हा व्हिडिओ 

Updated: Sep 26, 2019, 10:35 AM IST
सलमानच्या मागे धावलेल्या कुत्र्याची मुलाखत (व्हिडिओ)  title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईत आयफा अवॉर्ड 2019 संपन्न झाला. या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण त्यातील एका व्हिडिओने सगळ्यांच लक्ष वेधलं. तो व्हिडिओ म्हणजे सलमान खानच्या मागे रेड कार्पेटवर धावलेल्या कुत्र्याचा. आता या कुत्र्याचा चक्क मुलाखतीचा व्हिडिओ समोर आला आहे. 

अभिनेत्री अदिती भाटियाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. ज्यामध्ये IIFA Awards च्या रेड कार्पेटवर एक कुत्रा बसला आणि अदिती त्या कुत्र्याची मुलाखत घेत आहे. महत्वाचं म्हणजे तो कुत्रा देखील अदितीची सगळी गोष्ट लक्षपूर्वक ऐकत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 7 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Spread love! 

A post shared by Aditi Bhatia  (@aditi_bhatia4) on

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अदिती भाटियाने "स्प्रेड लव'' प्रेम वाटा या कॅप्शन खाली हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सुरूवातीला अदिती त्या कुत्र्याचं मनापासून कौतुक करते. आणि मग जेव्हा ती त्याला हॅलो सर असं म्हणते तेव्हा तो कुत्रा देखील तिला प्रतिसाद देताना दिसतो. अदिती कुत्र्याला प्रश्न विचारते की, आयफा अवॉर्डला 20 वर्षे पूर्ण झाली कसं वाटतंय तुला. 

आयफा पुरस्कारातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत आपण आयफा पुरस्कारात कलाकारांच्या मुलाखती पाहिल्या पण पहिल्यांदाच एका कुत्र्याची मुलाखत समोर आली आहे.