घरच्यांचा विरोध झुगारून अभिनेत्रीने CMसोबत लग्न केलं, दुसरी पत्नी बनली; आज 124 कोटींची मालकीण

Radhika Kumaraswamy: सिनेअभिनेत्री घरच्यांचा विरोध झुगारुन तिने लग्न केले. पण या लग्नामुळं एकच खळबळ उडाली.   

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 24, 2024, 02:47 PM IST
घरच्यांचा विरोध झुगारून अभिनेत्रीने CMसोबत लग्न केलं, दुसरी पत्नी बनली; आज 124 कोटींची मालकीण title=
Meet actress who married a CM against and become his second wife know her net worth

Radhika Kumaraswamy: एका लव्हस्टोरीमुळं कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. कन्नाडा चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि निर्माती राधिका यांनी 2006मध्ये घेतलेल्या निर्णयामुळं कन्नाडा चित्रपटसृष्टी व राजकारणातही मोठी खळबळ माजली होती. तिच्या खासगी आयुष्यासाठी जरी हा निर्णय योग्य असला तरी यामुळं तिचं करिअर मात्र खराब झालं. 

2006मध्ये अभिनेत्री राधिकाने सिक्रेट लग्न केलं होतं. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यासोबत तिने लग्न केले होते. दोघांनाही शमिका नावाची एक मुलगी देखील आहे. राधिका आणि कुमारस्वामी यांच्यात वयाचे खूप अंतर आहे. राधिका कुमारस्वामीचे जन्मवर्ष 1959 इतके आहे. एचडी कुमारस्वामी यांची पहिले लग्न 13 मार्च 1986 रोजी अनिथा यांच्यासोबत झाले होते. पहिल्या लग्नातून त्यांना एक मुलगा आहे.

2018मध्ये राधिका पहिल्यांदा चर्चेत आली होती. जेव्हा एचडी कुमारस्वामी यांच्यासोबतच त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कुमारस्वामी तेव्हा मुख्यमंत्री बनणार होते. राधिकाने 2002मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. नील मेघा शामा हा तिचा पहिला चित्रपट होता. इयत्ता नववीत असतानाच तिने सिनेसृष्टीत पहिले पाऊल ठेवले. प्रमुख भूमिकेत Ninagagi या चित्रपटातून ती झळकली. तिचे हे चित्रपट सुपरहिट ठरले. 

राधिकाने आत्तापर्यंत 30 चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर ती निर्मितीक्षेत्रात उतरली. 2012मध्ये तिने प्रोड्युस केलेला पहिला चित्रपट होता लकी. मात्र, चित्रपटांपेक्षा तिच्या खासगी आयुष्याचीच जास्त चर्चा झाली. 2010मध्ये तिच्या सिक्रेट मॅरेजचा खुलासा झाला. 2006 मध्ये तिने जेडीएस प्रमुख कुमारस्वामी यांच्यासोबत लग्न केल्याचा खुलासा केला. त्यांना शमिका नावाची एक मुलगीदेखील आहे. 

राधिका आणि एचडी कुमारस्वामी यांचे लग्न झाले तेव्हा त्यांचे वय 47 होते तर राधिका त्यांच्यापेक्षा 27 वर्ष लहान होती. राधिका त्यांची दुसरी पत्नी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधिकाचेही हे दुसरे लग्न आहे. 2000 मध्ये तिने रतन कुमार नावाच्या व्यक्तीशी लग्न केले होते. मात्र, ते काही फारकाळ टिकले नाही.

एच.डी कुमारस्वामी यांच्यासोबत लग्न करण्याच्या राधिकाच्या निर्णयावर तिचे वडील नाराज होते. त्यांनी या लग्नाला विरोध केला होता. मात्र, घरच्यांचा विरोध झुगारुन राधिकाने लग्न केले. तसंच, कित्येत वर्ष हे लग्न लपवूनदेखील ठेवले होते. राधिकाने चित्रपटात यश मिळवले नसले तरी ती कोरोडो रुपयांची मालकिण आहे. राधिकाची संपत्ती 124 कोटी इतकी आहे. तर, HD कुमारस्वामी यांची संपत्ती 181 कोटी इतकी आहे.