Atiq Ahmed Shot Dead : बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीनं Yogi Adityanath यांच्याबद्दल केलेलं ट्विट चर्चेत

Meera Chopra On Atiq Ahmed Praise UP CM Yogi Adityanath : काल अतिक अहमद (Atiq Ahmed Shot Dead) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांच्यावर हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या हत्येनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तर उत्तर प्रदेशच्या पोलिसांवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 16, 2023, 01:27 PM IST
Atiq Ahmed Shot Dead : बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीनं Yogi Adityanath यांच्याबद्दल केलेलं ट्विट चर्चेत title=
(Photo Credit : Meera Chopra Instagram/ Yogi Adityanath File Photo)

Meera Chopra On Atiq Ahmed Praise UP CM Yogi Adityanath : माफिया अतिक अहमद (Atiq Ahmed Shot Dead) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची हत्या करण्यात आली आहे. काल म्हणजेच 15 एप्रिल रोजी माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची हत्या झाली. त्या दोघांना पोलीस बंदोबस्तात मेडिकल चेकअपसाठी घेऊन जाण्यात येत होते.  त्यावेळीच ही घटना घडली आहे. अतिक अहमद आणि त्याच्या भावाच्या हत्येवर राजकारणींपासून सेलिब्रिटीही प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, त्यावर आता बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री मीरा चोप्रानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांना रॉकस्टार म्हटलं आहे. 

मीरा चोप्रानं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मीरा म्हणाली, सीएम योगी आदित्यनाथ एक रॉकस्टार आहेत. त्यासोबत मीरानं #atiqahmed असं म्हटलं आहे. मीराचं हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. मात्र, तिचं हे ट्वीट पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी मीराला ट्रोल केलं आहे. तर काहींनी मीरा योग्य बोलते असं म्हटलं आहे. 

कोण आहे मीरा चोप्रा?

मीरा चोप्रानं बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मीरा ही फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी देखील ओळखली जाते. त्याच प्रमाणे आताही मीरा ही तिच्या अशाच एका ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. मीरा चोप्रा ही बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि परिणीति चोप्रा यांची चुलत बहीण आहे. मीरानं हिंदी तामिळ, तेलगूसारख्या अनेक भाषांमध्ये काम केलं आहे. तर ‘1920 लंडन’, ‘गैंग ऑफ घोस्ट्स’, ‘सेक्शन 375’ सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर हॉटस्टारवरील ‘द टैटू मर्डर्स’ या सीरिजमध्ये देखील दिसली होती. 

हेही वाचा : Kanguva Movie: सुपरस्टार सूर्याच्या 'कंगुवा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, अभिनेता Disha Patani सोबत करणार रोमान्स

दरम्यान, काल रात्री झालेल्या प्रकरणानंतर उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तर या प्रसंगाची संधी साधत विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. इतकंच काय तर उत्तर प्रदेशच्या पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. 

काल रात्री अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांना मेडिकल चेकअपसाठी पोलीस घेऊन जात असताना तीन अज्ञात लोकांनी येऊन त्या दोघांवर हल्ला केला आणि पोलिसांसमोर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. तर त्या दोघांवर हल्ल्या करणाऱ्या आरोपींची नावं ही लवलेश तिवारी, सनी आणि अरुण मौर्य अशी आहेत. अतीक आणि अशरफ यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर तिघांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. तर ते तिघे हे 20 ते 25 वयोगटातील होते.