मुंबई : देशातील लोकप्रिय गायिका लता मंगेशकर यांनी शनिवारीच आपला 90 वा वाढदिवस साजरा केला आहे. भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लतादीदींनी 36 भाषांमध्ये गाणी गायली आहेत. अगदी 40 च्या शतकापासून लतादीदी आपल्या गाण्यातून प्रेक्षकांना आनंद देत आहेत.
सत्तरीच्या माणसापासून ते अगदी आताच्या तरूणाईपर्यंत साऱ्यांनाच लतादीदींची गाणी आपलीशी वाटतात. या तरूणाई लतादीदींनी फक्त गाण्यातूनच नाही तर सोशल मीडियातून देखील जुळवून घेतलं आहे. खूप कमी कलाकार आहेत जे सोशल मीडियावर ऍक्टिव असतात. त्यातील एक लतादीदी आहेत ज्या वयाच्या 90 व्या वर्षी देखील ऍक्टिव असतात.
आपल्याला माहितच आहेत लतादीदी सोशल मीडियाच्या ट्विटर हँडलवरून सगळ्यांशी संवाद साधत असतात. पण तुम्हाला माहित आहे का? लतादीदींच हे अकाऊंट कोण हँडल करतं? याचा खुलासा स्वतः लतादीदींच्या बहिणी मीनाताई मंगेशकर यांनी केला आहे.
मीनाताईंनी एका मुलाखतीत सांगितलं की, लता दीदी स्वतः आपलं ट्विटर अकाऊंट हँडल करतात. त्या स्वतः सगळे ट्विट करत असतात. त्या दिवसातून बराच काळ गाणं गातात. पहिल्यासारखं तानपुऱ्यावर त्यांना रियाज करता येत नाही. तसेच त्या स्वतः जेवण बनवतात.
आजही लतादीदी कुटुंबाची काळजी स्वतः घेतात. आशा यांची मुलं आली की, ती लतादीदीकडेच असतात, मीनाताईंनी सांगितलं. सगळ्यांची अगदी पहिल्यासारखीच काळजी त्या घेतात. हृदयनाथ मंगेशकर यांना लतादीदी आपला मुलगाच मानतात. आई-बाबा गेल्यानंतर त्यांची जागा दीदीने घेतली आहे. तीच आमची आई-बाबा असल्याचं मीनाताईंनी सांगितलं.