61 वर्षीय सेलिब्रेटीने 15 दिवसात केलं वजन कमी? फोटो व्हायरल

तिनं नुकताच आपला एक फोटो इन्टाग्रामवर शेअर केला आहे. 

Updated: Aug 20, 2022, 06:20 PM IST
61 वर्षीय सेलिब्रेटीने 15 दिवसात केलं वजन कमी? फोटो व्हायरल  title=

Hollywood Celebrity on Weight Loss:  वयाच्या 61 व्या वर्षीही वजन कमी करता येतं आणि आपण कुठल्याही वर्षी सुंदर आणि आकर्षक दिसू शकतो याची प्रचिती येते या हॉलीवूड सेलिब्रेटीकडे बघून. कॅरोल व्हॉर्डमन ही ब्रिटिश सेलिब्रेटी आणि सुत्रसंचालिका आहे तिनं नुकताच आपला एक फोटो इन्टाग्रामवर शेअर केला आहे. 

या फोटोत तिने कॅप्शन दिलं आहे की 15 दिवसांत तिने आपलं वजन कमी केलं असून आता तिला कपडेही चांगलेच फीट होत आहेत. तिने आपल्या घटलेल्या वजनाबद्दल खुलासा केला आहे की ती फक्त रेस्टोरंटचे जेवण जेवत होती पण त्याचबरोबर तिने सलग पंधरा दिवस ज्यूसचं सेवन केलं. 

कॅरोल वोर्डमनने तिचे वजन कमी केल्यानंतर आपले बिकीनीतले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याच्यासोबत सांगितले की एक शॉर्ट्स जी मला काही वर्षांपूर्वी होत नव्हती ती आता व्यवस्थित फीट होते आहे. आता मला जुनी शॉर्ट्स आणि बिकिनी फिट होत आहे. 

काय होत कॅरोलचं डाएट? - कॅरोल वोर्डमन वजन कमी करण्यासाठी काही दिवस घरापासून दूर एका कॅम्पमध्ये गेली होती. त्या शिबिरात तिने आपले वजन कमी केले. कॅरोल वोर्डमनने सांगितले की, या कॅम्पमध्ये तिला तीन दिवस रेस्टॉरंटमध्ये जेवण्याची परवानगी होती. 18 दिवसांच्या य़ा कॅम्पमध्ये रेस्टॉरंटमधले 3 दिवस जेवण खाल्यानंतर ती 15 दिवस ज्यूसवर राहिली. याशिवाय वेट लॉससाठी जे उपाय आवश्यक होते तेही तिने तिच्या कॅम्पमध्ये केले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वयाच्या साठव्या वर्षी तिने आपलं वजन कमी केल्याने तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.