मुंबई : #MeToo अभियानांतर्गत सिनेसृष्टीतील अनेक लोकांची नावे समोर आली. यामध्ये अनेक दिग्गज मंडळी देखील असल्याचं स्पष्ट झालं असताना आता आणखी एक मोठं नाव या प्रकरणात सहभागी असल्याचं समोर आलं आहे. भूषण कुमार या टी सीरीजच्या मालकावर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावण्यात आला आहे. मात्र फिल्ममेकर भूषण कुमार याने हे आरोप फेटाळले आहे. पण आता भूषण कुमार विरोधात लेखी तक्रार दिल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील ओशिवारी पोलीस स्थानकात भूषण कुमार विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार केली आहे. ही तक्रार त्यांच्याच कंपनीत काम करणाऱ्या एका महिलीने केली आहे. या महिलीने भूषण कुमारवर गंभीर आरोप केले आहेत. केलेल्या आरोपानुसार पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पण अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
टी सीरीजचे मालक भूषण कुमार याच्यावर गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ट्वीटरवर एका अज्ञात महिलेने आरोप लावला होता. आरोप असा होता की, प्रोडक्शन हाऊसमधील तीन गाणी गाण्याकरता अनैतिक संबंध ठेवण्यास सांगितले होते. ही गोष्ट कुणाला सांगितल्यास करिअर संपवण्याची धमकी देण्यात आली. मात्र भूषण कुमार यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, त्याला #MeToo प्रकरणात मला जबरदस्ती खेचलं जात आहे. ही गोष्ट माझ्यासाठी खूप चिंतेची आणि धक्कादायक आहे. माझ्या विरोधात केलेले सर्व आरोप खोटे आहेत. मी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ट्विटद्वारे मला अपमानीत करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं. पण अद्याप हे स्पष्ट झालं नाही की, तक्रार करणारी महिला आणि ट्विटरवर ट्विट करणारी महिला ही एकच आहे. पोलीस या गोष्टीचा देखील तपास करत आहे.