राधिकाचा सून ते मुलीपर्यंतचा प्रवास

सुभेदार कुटुंबियांनी दिला हा खास आहेर 

Updated: Dec 19, 2019, 05:54 PM IST
 राधिकाचा सून ते मुलीपर्यंतचा प्रवास title=

मुंबई : माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत राधिकाच्या दुसऱ्या लग्नाची गडबड आहे. राधिका आणि सौमित्र अनेक संकटांवर मात करत अखेर विवाहबंधनात अडकणार आहेत. यावेळी वातावरण आनंदाचं आणि थोडं भावूक आहे. सुन म्हणून आपल्या घरी घेऊन आलेल्या राधिकेचं आता सुभेदार दाम्पत्य लेक म्हणून कन्यादान करत आहेत. यावेळी त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत? हे झी चोवीस तासने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

राधिकाला काय आहेर केला असं विचारलं असता. गुरूनाथचे बाबा सांगतात की,'मी सौमित्र आहेर केलाय. आणि मला विश्वास आहे की, तो राधिकाला सुखात ठेवेल. आता तिचं आयुष्य सुखात, आनंदात जाईल.'

गुरूनाथच्या वडिलांनी सून म्हणून घरात आणलेल्या राधिकेची लेक म्हणून आज पाठवणी केली आहे. यावेळी त्यांना प्रचंड दुःख तर आहेच की, मुलगी आपल्याला सोडून जातेय. पण दुसरीकडून विचार केला तर मनातून आनंद देखील आहे. कारण ती नव्याने तिच्या आयुष्याला सुरूवात करणार आहे. राधिका आता तिच्या नव्या घरी अस्तित्व निर्माण करणार असल्याची भावना, राधिकेच्या सासऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

यावेळी राधिकेची सासू म्हणजे गुरूनाथच्या आईने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'या सोहळ्याचा जितका आनंद होतोय, तितकंच दुःख देखील वाटतंय. कोणत्याच आई-वडिलांच्या नशिबात असं नसावं. राधिकाच्या दुःखात मी होते. राधिका माझ्या काळजाचा तुकडा आहे. कुठच्याच सुनेचं अशापद्धतीने दुसरं लग्न होऊ नये,' अशी भावना गुरूनाथची आईने शेअर केली आहे. तसेच राधिकेच्या आईने राधिकेला अथर्व आहेर म्हणून दिला आहे. दर तीन महिन्यांनी राधिकेला अथर्वसोबत घरी बोलावलं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.