राधिका गुरूनाथला देणार का घटस्फोट?

काय होईल पुढे 

राधिका गुरूनाथला देणार का घटस्फोट?  title=

मुंबई : झी मराठीवरील 'लागिरं झालं जी' ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रियतेचं शिखर गाठत आहे. गुरूनाथने आता शनायाशी साखरपुडा करून या मालिकेला वेगळंच वळण दिलं आहे. तसेच साखरपुड्यानंतर गुरूच्या आयुष्यात काहीच चांगल होत नाही.तसेच ALF कंपनी आता डबगाईला आली आहे. त्याचे शेअर्स देखील मार्केटमध्ये चांगलेच कोसळले आहे. असं सगळं असताना गुरूनाथवर राधिका मसाले या कंपनीची मदत घेण्याची वेळ आली आहे. यामुळे आता गुरूनाथ नेमकं काय करणार हे पाहण्याची वेळ आली आहे. 

असं असताना गुरूनाथ राधिकाची अपॉयमेंट घेऊन तिला भेटण्यासाठी राधिका मसालेच्या ऑफिसमध्ये जातो. तिथे तो तिला मला तुझ्या मदतीची गरज आहे असं सांगून आपलं जुनं नातं आठवून देण्याचा प्रयत्न करतो. पण राधिका त्याला खडेबोल सुनावते. आणि याअगोदर अनेकदा गुरूनाथ राधिकाला घटस्फोट देण्याची धमकी देत असते. पण आता राधिका स्वतः गुरूनाथला घटस्फोट देणार असल्याच सांगते. 

राधिका गुरूनाथला कामानिमित्त मदत करणार का? की गुरूनाथला चांगलाच धडा शिकवून घटस्फोट देईल हे पाहणं चर्चेच राहणार आहे.