मुंबई : अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या मुंबई पोलिसांच्या कार्याला सलाम केला आहे. तेजस्विनी नवरात्रीच्या नऊ दिवसांत समाजातील प्रत्येक घटक जो कोरोनाच्या काळात महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
तेजस्विनीने पहिल्या दिवशी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आज तिने मुंबई पोलिसांची कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांच्यात खऱ्या अर्थाने देवाचं रुप दिसलं.
तेजस्विनीने पोलिसांच्या वेशातील एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये देवी पोलिसांच्या रुपात समाजातील गरजू, वयस्क व्यक्तींची मदत करताना दिसत आहे. त्यामुळे समाजासाठी कायम लढणाऱ्या पोलिसांमध्ये देवाचंच एक रुप आहे असं तिने यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
“सद्रक्षणाय खलनिग्रहणायच्या वाटेवरती कर्तव्य अन माणुसकीची कावड माझ्या हाती. तू नाहीस असहाय माते ! हात माझा सदैव तुझ्या हाती सदैव तुझ्या साठी….”, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. देवीचं साजरं रुप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोचं डिझाइन आणि इल्यूस्ट्रेशन उदय मोहितेने केलं आहे.