'ही' चिमुकली आज आहे इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्री... ओळख?

मेहनत आणि नशीबाचं चक्र... फोटोमध्ये आईच्या कडेवर दिसणारी ही चिमुकली आज करतेय इंडस्ट्रीवर राज्य... कोण आहे ही अभिनेत्री?   

Updated: Mar 17, 2022, 10:51 AM IST
'ही' चिमुकली आज आहे इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्री... ओळख?  title=

मुंबई : मेहनत आणि जिद्द त्यानंतर मिळणार फळ हे प्रत्येकाच्या नशीबात असतं. शिवाय लहानपणी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो आणि नशीब त्यांनी साथ देखील देतो. इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कलाविश्वात वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. अशाचं अभिनेत्रींपैकी एक म्हणजे, तेजश्री प्रधान...

सध्या तेजश्रीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये चिमुकली तेजश्री फार साधी आणि क्युट दिसत आहे. आईच्या कडेवर असलेली तेजश्री आज मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये तेजश्रीने मोलाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात राज्य केलं. 'होणार सून मी या घरची...' या मालिकेतून तेजश्री घराघरांत पोहोचली. 

शिवाय 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेच्या पहिल्या पर्वात शुभ्राने तिच्या लोकप्रियतेत भर घातली. नाटक, सिनेमा, मालिका गाजवणारी तेजश्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.