पूनम पांडेचा विचित्रपणा पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल, पाहा व्हिडिओ

कंगना राणौतचा शो लॉकअपला तिसऱ्या आठवड्यातही भरपूर लोकप्रियता मिळत आहे. 

Updated: Mar 16, 2022, 08:43 PM IST
पूनम पांडेचा विचित्रपणा पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल, पाहा व्हिडिओ title=

मुंबई : कंगना राणौतचा शो लॉकअपला जेवढी पहिल्या आठवड्यात लोकप्रियता मिळाली  तितकीच तिसऱ्या आठवड्यातही मिळत आहे. शोचे सगळे स्पर्धक कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत आले आहेत. ज्यामध्ये पूनम पांडे देखील एक आहे. पूनम बऱ्याच दिवसांपासून पब्लिक स्टंट्समुळे लाइमलाईटमध्ये आली होती. लॉकअपमध्येही पूनम पांडे कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.

यावेळी पूनम पांडेने कॅमेरासमोर विचित्रपणा  करून प्रसिद्धीझोतात येण्याचा प्रयत्न केला आहे. खरंतर, अलीकडेच Alt बालाजीने सोशल मीडियावर लॉकअप शोचा नवीन प्रोमो रिलीज केला आहे. प्रोमो व्हिडीओमध्ये पूनम पांडे पहिल्यांदा टेबलवर विचीत्र हालचाली करताना दिसते. मग ती त्याच स्टाईलमध्ये करणवीर बोहराकडे जाते. त्यानंतर करणवीर अली मर्चंटसोबत बोलू लागते.

पूनम पांडे करणवीर बोहराकडे जाते आणि विचित्र पद्धतीने विचारते, तुम्ही काय बोलत आहात? तेव्हा करणवीर बोहरा म्हणतो, आम्ही काहीतरी महत्वाचं बोलतोय. यानंतर पूनम समोरून विचारते, तुम्ही एवढं काय गंभीर बोलत आहात, ज्याचा मी भाग होऊ शकत नाही यानंतर करणवीर रागाने पूनमला म्हणतो, पूनम आम्हाला फक्त पाच मिनिटे दे. यानंतरही पूनम त्याच विचित्र पद्धतीने विचारते की तुला पाच मिनिटे का हवी आहेत. यावर करणवीर बोहरा चिडतो आणि म्हणतो की तू असं का वागतेयस?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पूनम पांडेने नुकत्याच तिचा पती सॅम बॉम्बेबद्दल अनेक खुलासे करत तिची व्यथा मांडली आहे. पूनमने सांगितलं की, सॅम तिला फोनला हातही लावू द्यायचा नाही. एवढंच नाही तर तो तिला इतका मारायचा की एकदा तिचं ब्रेन हॅमरेजही झालं होतं.