मुंबई : मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) तिचे काही साडीतले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचा हा साडीतील लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. तिच्या या लूकची सोशल मीडियावर चर्चा आहे.
सोनाली कुलकर्णीने आकाशी रंगाची साडी (Sonalee kulkarni saadi look) घाडली असून त्यावर काळ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचे चाहते देखील त्यावर कमेंट करत आहेत.
सोनाली कुलकर्णीचा नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत राहिली आहे. तिचा प्रत्येक लूक हा चाहत्यांना आवडतो. सध्या तिचे हे साडीतील फोटो व्हायरल होत आहेत.