ना गाजावाजा, ना भरमसाट मेकअप; ठसठशीत नथीचा श्रृंगार करत मराठमोळी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Updated: Aug 18, 2022, 12:49 PM IST
ना गाजावाजा, ना भरमसाट मेकअप; ठसठशीत नथीचा श्रृंगार करत मराठमोळी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात  title=

मुंबई : मराठी-हिंदी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधील नेहा जोशी एक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नेहा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच नेहा लग्नबंधनात अडकली आहे.  नेहानं सप्तपदी घेतल्या असून त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

आणखी वाचा : मलायका अरोराच्या Superbold लूकवरून अर्जुन कपूचीही नजर हटेना, पाहा Photo

नेहानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नेहानं मुंडावळ्या बांधल्या आहेत. तर नेहाचा पती दिसत आहे. नेहाच्या पतीचं नाव ओमकार कुलकर्णी आहे. हा फोटो शेअर करत 'अखेर लग्नबंधनात अडकले', असे म्हटले आहे. यासोबतच नेहानं आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत फक्त नेहा दिसत आहे. हा फोटो शेअर करत 'माझ्या आयुष्यातील नवीन भूमिका', असे कॅप्शन दिले आहे. 

आणखी वाचा : Good News नंतर बिपाशाच्या पतीवर का संतापले नेटकरी? अभिनेत्याच्या Attitude वर जळजळीत टीका

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नेहाच्या या फोटोंवर फक्त नेटकऱ्यांनी नाही तर सेलिब्रिटींनी देखील कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : सलमान खानला Aids ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर

दरम्यान, नेहानं आतापर्यंत अनेक मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. ‘वाडा चिरेबंदी’, ‘बेचकी’, ‘कनुप्रिया’ या नाटकात तिने फार उल्लेखनीय काम केले आहे. त्यासोबतच ‘झेंडा’, ‘पोस्टर बॉइज’, ‘लालबागची राणी’, ‘बघतोस काय मुजरा कर,’ अशा चित्रपटातही काम केले आहे.