'आधी स्वत:चे तेवढे टिकवा...', लग्नाचा सल्ला देणाऱ्यांना केतकी चितळेचा टोला

 सध्या केतकी ही सिनेसृष्टीपासून दूर आहे. आता केतकी चितळेने तिच्या लग्नावरुन ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला सुनावले आहे. 

नम्रता पाटील | Updated: Feb 9, 2024, 06:27 PM IST
'आधी स्वत:चे तेवढे टिकवा...', लग्नाचा सल्ला देणाऱ्यांना केतकी चितळेचा टोला title=

Ketaki Chitale On Marriage Trolling : मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे ही सतत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर केतकी चितळे ही प्रसिद्धीझोतात आली. या पोस्टमुळे तिला 41 दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला होता. सध्या केतकी ही सिनेसृष्टीपासून दूर आहे. आता केतकी चितळेने तिच्या लग्नावरुन ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला सुनावले आहे. 

केतकी चितळेचे लग्नाच्या प्रश्नावर उत्तर

केतकी चितळे ही सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. ती इन्स्टाग्रामवर विविध विषयांवर भाष्य करत असते. केतकी आता 31 वर्षांची आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक जण केतकीला तू कधी लग्न करणार असा प्रश्न विचारताना दिसत आहे. पण तिने यावर उत्तर देण्यास नेहमीच टाळाटाळ केली आहे. आता मात्र केतकीने तिच्या लग्नाबद्दल भाष्य केले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ketaki Chitale (@epilepsy_warrior_queen)

केतकी चितळे काय म्हणाली?

केतकीने एक पोस्ट शेअर केली आहे. "माझ्या घरच्यांपेक्षा माझ्या ट्रोल्सना माझ्या लग्नाची चिंता!!! स्वत:चे टिकवा!", अशी पोस्ट केतकी चितळेने केली आहे. तिने याद्वारे ट्रोलर्सलाही सडेतोड उत्तर दिले आहे. केतकीची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. 

Ketaki Chitale

सध्या सिनेसृष्टीपासून दूर

दरम्यान केतकी चितळे ही सध्या मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे. पण ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे दिसते. केतकीने स्टार प्रवाहवरील ‘आंबट गोड’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती झी मराठीवरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेत झळकली. या मालिकेमुळेच ती खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाली. केतकीने हिंदीमधील सोनी टीव्हीवरील ‘सास बिना सुसराल’ या मालिकेतही काम केलं होतं. केतकीला एपिलेप्सी हा आजार झाला आहे. 

केतकीने काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल पोस्ट शेअर केली होती. या आक्षेपार्ह पोस्टमुळे तिला तुरुंगवास भोगावा लागला होता. याच तुरुंगवासाच्या प्रवासावर केतकीने एक पुस्तक लिहिले आहे. लवकरच हे पुस्तक प्रकाशित होणार असल्याचे बोललं जात आहे.