ही मराठी अभिनेत्री करणार कपिल शर्माचा शो होस्ट

कॉमेडी किंग कपिल शर्मा लवकरच पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येतोय. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 12, 2018, 04:04 PM IST
ही मराठी अभिनेत्री करणार कपिल शर्माचा शो होस्ट title=

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा लवकरच पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येतोय. 

कपिलचं कमबॅक

कपिलचे फॅन्स त्याच्या कमबॅकची वाट पाहत आहेत. शोचा प्रोमो रिलीज झाला आहे. कपिल एका वेगळ्या अंदाजात पुन्हा कमबॅक करतोय. कपिलचा हा नवा शो फॅमिली टाईम विद कपिल शर्मा हा एक गेम शो असणार आहे. सोबतच यामध्ये धमाल, मस्ती पाहायला मिळणार आहे. या शोकडून कपिलला खूप आशा आहे. या शोची होस्ट एक टीव्ही अभिनेत्री असणार आहे.

कोण आहे होस्ट

कपिलचा शो हा एक गेम शो असणार आहे. कपिलच्या या शोचं होस्टींग अभिनेत्री नेही पेंडसे ही करणार आहे. नेहाने 'मे आय कम इन मॅडम' सिरीअलमध्ये काम केलं होतं. टीव्हीवरची ही एक प्रसिद्ध चेहरा आहे. नेहाने मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील खूप नाव कमावलं आहे. तिच्या वजनमुळे तिला हा शोमधून काढण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. त्यामुळे तिला वजन कमी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. नेहाने पोल डांस शिकून तिचं वजन खूप कमी वेळात कमी केलं आहे. तिचा ग्लॅमर लूक सध्या खूप चर्चेत आहे.

Image result for neha pendse zee

कोण आहे पहिला सेलिब्रिटी

या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता अजय देवगन हजेरी लावणार आहे. रेड या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अजय पहिल्या एपिसोडमध्ये उपस्थित राहणार आहे. अजय सोबतच इलियाना डिक्रुज देखील या सिनेमात काम करतेय. त्यामुळे ती देखील या शोमध्ये येणार आहे.

कपिलने घेतला धडा

अजयने कपिलसोबत एक प्रोमो देखील शूट केला आहे. मागच्या शोपासून कपिल खूप काही शिकलाय. मागचा शो बंद झाल्याने त्याला चांगलाच धक्का बसला होता. त्यामुऴे आता कपिल काय नवीन घेऊन येतो हे पाहावं लागेल. 25 मार्चला हा शो सुरु होऊ शकतो.