Good News! मुलगी झाली हो... या अभिनेत्रीला कन्यारत्नाची प्राप्ती

सोशल मीडियावर डोहाळे जेवणाचे फोटो केले होते पोस्ट 

Updated: Aug 26, 2021, 07:00 AM IST
Good News! मुलगी झाली हो... या अभिनेत्रीला कन्यारत्नाची प्राप्ती title=

मुंबई : बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्रींनी गुड न्यूज दिली आहे. आई होणं ही प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील खास गोष्ट असते. आपल्यामधून एक जीव जन्माला येणं ही भावनाच मुळात खूप आनंददायी आहे. असाच आनंद सध्या एक मराठमोळी अभिनेत्री अनुभवत आहे. (Marathi Actress Dipashree Mali blessed with baby girl, shared first photo ) या अभिनेत्रीने आपल्या बाळंतपणाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 

या मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव आहे दीपश्री माळी. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपश्री माळीने आपल्या डोहाळजेवणाचे फोटो सोशल मीडिया वर शेअर करत तिच्या चाहत्यांना ती आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. नुकतीच तिने आपल्याला मुलगी झाली असल्याची गोड बातमी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dipashree (@dipashreedmali)

आपल्या मुलीबरोबरचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी तिने चाहत्यांना दिली. या फोटो मध्ये तिच्या नवजात मुलीने तिचे बोट पकडले आहे. या फोटोमध्ये या दोघींचे केवळ हात दिसत आहेत. मात्र फोटो बराच बोलका आहे. दीपश्रीला झालेला आनंद यातून दिसून येत आहे.

या फोटोला तिने एक सुंदर कॅप्शन देखील दिली आहे. “एक नवीन स्पर्श, नवीन साथ कायमची, एक विश्वास निरंतर राहणारा, एक प्रवास एकत्रीत नवीन विश्व नवीन आयुष्य, आतून बाहेरून बदलुन टाकणारं आणि शेवटपर्यंत हक्काने सतत कानावर ऐकू येणारा निःशब्द करणारा एकच शब्द “आई “. काल आमच्या घरी लक्ष्मी आली मुलगी झाली हो Proud Mom.. Yesterday Blessed with Baby Girl” अशा शब्दांत तिने आपला आनंद व्यक्त केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dipashree(@dipashreedmali)

दीपश्री मराठी मालिकांमध्ये काम करते. साधारण चार वर्षांपूर्वी तिचे अमेय माळीबरोबर लग्न झाले होते. अभिनयाची पहिल्यापासूनच आवड असल्याने दीपश्रीने लग्नानंतर देखील आपली ही आवड जपली आहे. ‘गर्ल्स हॉस्टेल’ या मालिकेत तिने साकारलेली भूमिका सगळ्यांनाच आवडून गेली. झी युवा वाहिनीवर ही मालिका प्रसारीत होत होती. त्यानंतर तिने ‘एक घर मंतरलेलं’ या मालिकेतही भूमिका साकारली.