'तिनं पैसे अंगावर फेकले अन्...' मराठी अभिनेत्याला अभद्र शब्दांत सुनावत प्रेयसीनं केला होता ब्रेकअप

Marathi Actor Breakup News: मराठी कलाकारही त्यांच्या लव्ह आणि रिलेशनशिप्ससाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका मराठमोळ्या अभिनत्यानं आपल्या ब्रेकअपचा किस्सा सांगितला आहे. तो ऐकून तुम्हीही कदाचित त्यांची स्तुती कराल. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 29, 2023, 01:32 PM IST
'तिनं पैसे अंगावर फेकले अन्...' मराठी अभिनेत्याला अभद्र शब्दांत सुनावत प्रेयसीनं केला होता ब्रेकअप title=
July 29, 2023 | marathi actor santosh juvekar shares his breakup experience when her girlfriend insulted him

Santosh Juvekar: बेक्रअप होणं हे आपल्या सगळ्यांमध्ये फार कॉमन असतं. त्यातून प्रेमात अखंड बुडाल्यानंतर अशा टप्प्यावर प्रेमात द एन्ड करणं हे काहीच कोणाला सोप्पं जात नाही. परंतु कधी ना कधी तरी ब्रेकअप करणं हे महत्त्वाचंच असतं. आपल्याला आयुष्यातील तो एक शिकवणारा आणि हळवा टप्पा असतो. अनेक कलाकारही या फेसमधून जाताना दिसतात. त्यामुळे त्यांचीही फार चर्चा रंगलेली असते. त्यांच्या रिलेशनशिप्सबद्दल आणि त्यांच्या ब्रेकअपबद्दल अनेकदा लिहिलं आणि बोललं जातं. त्यातून त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका मराठमोळ्या कलाकाराच्या ब्रेकअपबद्दल चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. त्यांच्याही रिलेशनशिपबद्दल अनेकदा चर्चा होताना दिसते परंतु त्यानं यावेळी त्यांच्या ब्रेकअपबद्दल खुलासा केला आहे. त्यानं यावेळी आपल्या एक्स-गर्लफ्रेंडबद्दल कमेंट केली आहे. 

सध्या चर्चा आहे ती म्हणजे संतोष जुवेकर याची. त्यानं नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या ब्रेकअपचा किस्सा सांगितला आहे. तिच्या 'डेट भेट' हा चित्रपट 14 जूलैला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानिमित्त त्यानं प्रमोशनच्यावेळी एका मुलाखतीत किस्सा सांगितला आहे. हा चित्रपट लव्ह, रिलेशनशिप आणि ब्रेकअपवर आधारित आहे. त्यामुळे हा चित्रपट त्याच धर्तीचा आहे. तेव्हा या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्याच्या यावेळी आपला ब्रेकअपचा किस्सा सांगितला आहे. यावेळी त्यानं आपल्या या ब्रेकअपची कटु आठवण अगदी प्रामाणिकपणे सांगितली आहे. त्यामुळे त्याची चांगलीचा चर्चा रंगलेली आहे. तेव्हा चला तर मग पाहुया की नक्की यावेळी तो काय बोलला आहे. 

हेही वाचा - 'पुरूषांचे भारीपण कोणी दाखवणार नाही' अशोक सराफ यांचा सवाल

संतोष जुवेकर म्हणाला की, ''मी लंडनला गेलो होतो. तेव्हा माझ्या गर्लफ्रेंडला वाटलं की लंडनला दुसऱ्या एका मुलीला भेटायला गेलो आहे. तेव्हा तिचा संशय दूर व्हावा म्हणून मी तिला व्हिडीओ कॉल लावला आणि तिला सांगितलं की मी मित्राकडे आहे. पण तिच्या मनातला संशयाचा किडा काही केल्या जाईना. मग दोन दिवसांनी तिनं माझा फोन नंबरही ब्लॉक केला. एक दिवस ती मला गोरेगावला भेटायला आली. ती मला म्हणाली की मला आता नातं पुढे वाढवायचं नाहीये. मी म्हणालो की ओके''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

''आम्ही दोघंही कॉफी शॉपमध्ये गेलेलो होतो. तेव्हा मी कॉफी पिऊन झाल्यावर माझ्या कॉफीचे पैसे दिले तेव्हा मी तिला म्हटलं की तू तूझे भर. त्यावेळी तिला राग आला आणि तिनं मला अभ्रद शब्दात ऐकवले. तिनं 500 रूपये काढले आणि माझ्या अंगावर फेकून दिले आणि मग ती रागानं निघून गेली. मी तेच पैसे वेटरला देऊन तिथून निघालो.'', अशी आठवण त्यांनी सांगितली आहे.