'बुक्कीत फोडलेला कांदा, चुलीवरची भाकरी अन्...', मिलिंद गवळींनी सांगितले पारंपारिक पदार्थांचे महत्त्व

आता त्यांनी फास्टफूडबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी पारंपारिक पदार्थ कसे चांगले असतात याबद्दलही वक्तव्य केले आहे. 

Updated: Mar 22, 2024, 08:13 PM IST
'बुक्कीत फोडलेला कांदा, चुलीवरची भाकरी अन्...', मिलिंद गवळींनी सांगितले पारंपारिक पदार्थांचे महत्त्व title=

Milind Gawali Traditional Food : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून आई कुठे काय करते ला ओळखले जाते. या मालिकेतील सर्वच कलाकार हे नेहमीच विविध कारणांनी प्रसिद्धीझोतात असतात. या कार्यक्रमात मिलिंद गवळी हे अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारताना दिसत आहेत. आता त्यांनी फास्टफूडबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी पारंपारिक पदार्थ कसे चांगले असतात याबद्दलही वक्तव्य केले आहे. 

मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमीच विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. आता मिलिंद गवळी यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचे काही ब्लॅक अँड व्हाईटमधील फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी जुनं ते सोनं याबद्दल उल्लेख केला आहे. 

मिलिंद गवळींनी सांगितले महत्त्व

आशय खूप खूप आभारी आहे मी तुझा, सकाळी सकाळी लवकर उठून माझे फोटो काढल्याबद्दल धन्यवाद! माझ्यामध्ये आणि आशय मध्ये एक common factor, एक सामान आवड आहे, ती म्हणजे कृष्णधवल photos ची , black and white pictures ची , दोघांना हे कृष्णधवल चित्र फार फार आवडतात, आणि अशी चित्र काढण्याचा आशय चा हातखंड आहे, तो ते Photos फारच भारी काढतो, मला सारखं असं वाटतं की काही बाबतीत तरी technology advance व्हायला नको होती, बघाना पूर्वी black and white त्या जमान्यामध्ये किती सुंदर सुंदर चित्रपट झाले आणि ते आजही तेवढेच मनामध्ये घर करून बसले आहेत, पूर्वीच्या हिरोइन्स चे जे black and white फोटोज इतक्या वर्षानंतर आजही खूप खूप सुंदर वाटतात, नूतन मधुबाला मीनाकुमारी नर्गिस, मराठीमध्ये जयश्री बाई गडकर, दुर्गा खोटे, सुलोचना दीदी, स्मिता पाटील. आजही त्यांच्या सौंदर्याला matchच नाही आहे !

मुगल-ए-आजम चित्रपट तयार व्हायला बारा वर्षे लागली, के.असिफ यांनी हा चित्रपट सुरू केला त्या वेळेला ब्लॅक अँड व्हाईट जमाना होता, इतका भव्य दिव्य सिनेमा होता, भव्य दिव्य सेट होते, ते सगळे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये शुट झाले, पिक्चर संपता संपता रंगीत सिनेमाचा काळ सुरू झाला होता, मग के.आसीफ ने मोगल-ए-आजमचं एक गाणं “प्यार किया तो डरना क्या”कलर मध्ये शूट केलं, पण ते गाणं कलर मध्ये शूट केलं नसतं तरी सुद्धा मोगल-ए-आजमचं भव्य दिव्य आणि सौंदर्य कमी झालं नसतं, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये मला असं वाटतं तो अधिक सुंदर दिसला आहे! 1953 मध्ये झाशीची राणी सौरभ मोदींनी पहिलं coloured पिक्चर तयार केलं.

मग त्यानंतर कोणी मागे वळून पाहिलंच नाही, फक्त कलर एके कलर चित्रपट आले, फोटोस पण आपण coloured काढायला लागलो. पण मला आता असं वाटायला लागलं की झालं आपण आता कलर बिलर सगळं करून परत मागे वळून ब्लॅक अँड व्हाईट आपल्याला जास्त आवडायला लागणार, जसं बर्गर पिझ्झा पास्ता नूडल्स टाकोज नाचोज या सगळ्याची चव घेऊन झाली आहे आणि आता परत एकदा चुलीवरच्या भाकऱ्या, पिठलं किंवा एखादी मेथीची भाजी, एका बुक्कीत फोडलेला कांदा, लसणाची किंवा शेंगदाण्याची किंवा खुरसणीची चटणी किंवा मिरचीचा ठेचा. याला जी चव आहे ना, ती जगातल्या कुठल्याच पदार्थाला नाही, तसंच ब्लॅक अँड व्हाईट फोटोज ला,पिक्चर ला जी मजा आहे ना ती कुठल्याही कलर Photo ला ,सिनेमाला नाही! असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे. 

दरम्यान मिलिंद गवळी हे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. सध्या ते शूटींगच्या निमित्ताने पंजाबमध्ये गेले आहेत.