Marathi Movie Shaktiman Trailer Out: आपल्या प्रत्येकाला बालपणी सुपरहिरो आवडत असतात. त्यांच्या अलौकिक शक्ती, त्यांचा धाडस, त्यांची चपळता आपल्याला भुरळ घालते. पण खऱ्या आयुष्यातला सुपरहिरो कसा असतो? कोण असतो ? खऱ्या आयुष्यातला सुपरहिरो हा कोणत्याही अलौकिक शक्तींचा स्वामी नसतो, तो फक्त एक सामान्य आल्यासारखा माणूस असतो. पण त्यात वेगळं असतं ते त्याचं प्रेम, त्याची जिद्द आणि त्याचं समर्पण आणि हेच त्याला एक खरा सुपरहिरो बनवतं. असाच एक सुपरहिरो लवकरच रुपेरी पडद्यावर आपल्या भेटीला येत आहे, तो म्हणजे 'शक्तिमान'! दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट "शक्तिमान" च्या ट्रेलरने मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक खळबळ उडवून दिली आहे. आदिनाथ कोठारे, स्पृहा जोशी, प्रियदर्शन जाधव, ईशान कुंटे आणि विक्रम गायकवाड़ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एका सामान्य माणसाची असामान्य कथा दिसून येत आहे.
शक्तिमान या चित्रपटाचा नावामुळे खरतर एक काल्पनिक सुपरहीरो च चित्र सर्वत्र रंगलेल होत . मात्र शक्तिमान चा ऑफिसियल ट्रेलर आल्यामुळे मुळे आता सर्व गैरसमज दूर झाले आहेत. शक्तिमान ट्रेलर ची सुरुवात होते , एका हॉस्पिटल मध्ये बेड वर झोपलेल्या छोट्याश्या मुलीच्या वाक्याने , ती निरागसतने आदिनाथ ला म्हणते " काका , तुम्हाला महितेय थोड्या दिवसात मी कुठे जाणार आहे ? आदिनाथ खुप प्रेमाने आणि कुतूहलाने हसत विचारतो " कुठे जाणार आहेस ? " आणि ती म्हणते " बाप्पा कड़े ! " आणि मरणाला थिजलेल्या त्या मुलीकडे पाहुन आदिनाथ बरोबरच प्रेक्षकांच्या मनाचा ठोका चुकतो!
या उत्तराने चित्रपटाचा वाढता क्रम अनेक उत्कृष्ट सीक्वेंस दाखवत चित्रपट उलगडत जातो. आणि एक इमोशनल रोलरकोस्टर प्रेक्षकांची उत्कंठा पणावर नेते , आणि शेवटी स्पृहा जोशी चा भन्नाट डायलॉग , " सुपरहीरो व्हायचे आहे ना तुला , नक्की हो , पण माहिती साठी सांगते सुपरहीरो ला बायको नसते“ असे अनेक सुपरहिट डायलॉग आणि सिक़्वेन्स आपल्याला ट्रेलर मध्ये पहायला मिळतात आणि शक्तिमान चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना २४ मे ला चित्रपटगृहात नक्कीच एक उत्तम कंटेत पहायला मिळणार आहे याची खात्री मिळते. अर्थात स्पृहाच्या या बोलण्याचा नक्की अर्थ काय आणि हा शक्तिमान त्या मुलीला वाचवू शकतो का ? एक बाबा आपल्या मुलासाठी आणि इतर मुलांसाठी शक्तिमान बनू शकतो का ? या आणि अशा अनेक गोष्टी चित्रपटगृहात गेल्याशिवाय नाहीच कळणार .
या चित्रपटात आदिनाथ कोठारे , स्पृहा जोशी ही फ्रेश जोड़ी पहिल्यांदा एकत्र येत असून प्रियदर्शन जाधव , ईशान कुंटे आणि विक्रम गायकवाड यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ट्रेलरमध्ये त्यांच्या भूमिकांची झलक दिसते आणि प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवते.
चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी यापूर्वी 'कॉफी आणि बरंच काही', 'अँड जरा हटके', 'हंपी' आणि 'सायकल' अशा वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाने प्रेक्षकांना वेगळा विचार करायला भाग पाडलं आहे. त्यामुळे 'शक्तिमान' हा चित्रपटदेखील एक वेगळा आणि प्रभावी संदेश देणारा ठरेल यात शंका नाही. 'शक्तिमान' हा चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.