भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या घरी आली नन्ही परी....

शेअर केला पहिला फोटो 

Updated: Dec 31, 2020, 08:55 PM IST
भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या घरी आली नन्ही परी....  title=

मुंबई : दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष मनोज तिवारी यांच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. दिल्लीचे खासदार मनोज तिवारीच्या घरी बुधवारी एका कन्या रत्नाचं आगमन झालं आहे. मनोज तिवारीने ट्विट करून ही माहिती दिली आहे. 

ट्विटरवर ही माहिती दिल्यानंतर मनोज तिवारींवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. ‘मेरे घर आयी एक नन्ही परी… I am blessed with a baby girl…’’जय जगदंबे’ , असं म्हणत त्यांनी या चिमुकलीचं स्वागत केलं आहे. मनोज तिवारी यांना पहिली मुलगी असून सध्या ती मुंबईत शिक्षण घेत आहे. . मनोज तिवारी अनेकदा तिला भेटायला मुंबईत येत असे. 

मनोज तिवारीने २०१३ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१४ च्या लोकसभेत निवडणुकीत उत्तर पूर्वी दिल्लीतून पहिल्यांदा भाजपकडून तिकिट मिळवलं. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश अग्रवाल यांना हरवलं होतं. त्यानंतर भाजपचे अध्यक्ष झाले. 

दरम्यान, मनोज तिवारी हे लोकप्रिय भोजपुरी अभिनेता आहेत. ‘ससुराल बडा पैसावाला’ या चित्रपटातून त्यांनी कलाविश्वात पदार्पण केलं. त्यांचे धरती काहे पुकार के, भोले शंकर, जनम जनम के साथ, ऐलान, अंधा असे अनेक चित्रपट गाजले आहेत. अभिनेता असण्यासोबतच राजकीय विश्वातदेखील ते तितकेच कार्यरत आहेत.