रुपाली भोसलेकडे आली नवी पाहुणी.....

अशा व्यक्त केल्या भावना 

Updated: Dec 31, 2020, 05:46 PM IST
रुपाली भोसलेकडे आली नवी पाहुणी.....  title=

मुंबई : हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. आज पुन्हा एकदा रुपालीची चर्चा रंगली आहे. रुपालीचा नुकताच वाढदिवस झाला आहे. रुपालीने स्वतःला वाढदिवसादिवशी खास गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट रुपालीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle)

सोशल मीडियावर ऍक्टीव असणाऱ्या रुपालीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ग्लॅमरस अंदाजात दिसत असून एका लॉविश कारसोबतचा फोटो शेअर केला आहे. 

रुपालीने तिच्या वाढदिवसानिमित्त स्कोडा या कंपनीची कार खरेदी केली आहे. या कारसोबत रुपालीने फोटो शेअर केले आहेत. सोबतच एक खास कॅप्शनदेखील दिलं आहे. आणि ती इथे आहे. ती फक्त चारचाकी किंवा इंजिन नाहीये, तर माझ्यासाठी ते घर आहे. ही डुग्गू मी स्वत:लाच वाढदिवसाची भेट म्हणून दिली आहे. स्वागत आहे. माझ्या कारलाही वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं कॅप्शन रुपालीने या पोस्टला दिलं आहे.

रुपाली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'आई, कुठे काय करते?' या मालिकेत संजनाची भूमिका साकारताना रुपाली दिसत आहे.