'मुलींसोबत खेळू नका...', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये Manasi Naik हे काय बोलून गेली

अभिनेत्री Manasi Naik नं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यामुळे मानसीचा घटस्फोटच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. 

Updated: Nov 25, 2022, 02:19 PM IST
'मुलींसोबत खेळू नका...', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये Manasi Naik हे काय बोलून गेली title=

Manasi Naik Divorce: मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) ही तिच्या उत्तम नृत्यशैलीसाठी ओळखली जाते. मानसीचं ‘बघतोय रिक्षावाला’ (Baghtoy Rikshawala), ‘बाई वाड्यावर’ ही गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती. खरंतर या गाण्यांमुळे मानसीला घराघरात ओळख मिळाली. मानसी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मानसी चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. (Mansi Naik Husband Pradeep Kharera) दरम्यान, घटस्फोटाच्या चर्चेत मानसीनं सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. (Mansi Naik Social Media)

हेही वाचा : कसलं भारी! 31 गायी दत्तक घेणारा Kichcha Sudeep च खरा सुपरस्टार

मानसीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. तिनं यावेळी काळ्या रंगाचा ड्रेस परिधा केला आहे. यावेळी मानसीनं दिलेल्या कॅप्शननं ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'अशा मुलींसोबत खेळू नका, ज्या तुमच्यापेक्षा चांगलं खेळू शकतात' असं कॅप्शन मानसीनं दिलं आहे. मानसीच्या या पोस्टचा संदर्भ तिच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडला जात आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कोण आहे मानसी नाईकचा पती प्रदीप खरेरा? 

मानसीसा पती प्रदीप खरेरा हा एक बॉक्सर आणि मॉडेल (Mansi Naik Husband Profession)आहे. बरीच वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी सप्तपदी घेण्याचा निर्णय घेतला होता. नेहमीच पतीसोबत फोटो शेअर करणारी मानसी गेल्या काही दिवसांपासून प्रदीपसोबतचे फोटो शेअर करत नसल्याचे काही नेटकऱ्यांच्या लक्षात आले आहे. फक्त मानसी नाही तर तिचा पती प्रदीप देखील नेहमीच मानसीसोबत फोटो शेअर करायचा. (Mansi Naik Husband Is Boxer and Model)आता त्याच्या अकाऊंटवरही मानसीचे फोटो दिसत नाही असे म्हणत काही नेटकऱ्यांनी ती विभक्त झाले का किंवा त्यांच्यात दुरावा आला का असा प्रश्न केला आहे. दरम्यान, त्या दोघांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही. मानसी आणि प्रदीप 19 जानेवारी 2021 रोजी लग्नबंधनात अडकले होते.