'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता अजिंक्य राऊतचा मोठा अपघात

छोट्या पडद्यावरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Updated: Nov 9, 2021, 07:46 PM IST
'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता अजिंक्य राऊतचा मोठा अपघात title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील 'मन उडू उडू झालं' या मालिकेने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या मालिकेत इंद्रा ही भूमिका साकारणारा अभिनेता अजिंक्य राऊतच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येतेय.

अजिंक्य राऊतच्या गाडीला गंभीर अपघात झाला आहे. अजिंक्यने व्हिडिओ शेअर करत याबाबतची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. हा व्हिडिओ शेअर करत अजिंक्यने सगळ्यांना काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे. सुदैवाची बाब म्हणजे या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाहीये. ही बातमी शेअर करताच अजिंक्यच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. याचबरोबर त्याला त्याचे चाहते काळजी घ्यायला सांगत आहेत.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अजिंक्य चाहत्यांना गाडी चालवताना काळजी घेण्याचं आवानही करत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अजिंक्य म्हणालाय की, ''माझा अपघात झाला आहे. पण सुदैवाने मला कोणतीही ईजा झाली नाहीये. फायनली मी गावी जाऊ शकेन, सुदैवाने आमच्या गाडीचा स्पीड खूप कमी होता त्यामुळे काही भयावह असं घडलं नाही. आणि नशिबाने आजूबाजबला दरी असलेला रोड नव्हता. 

आमची गाडी अशीकाही स्किट झालीये. ती ही ११०० वोल्टच्या खांबावर आदळणार होती ती आदळू नये म्हणून मित्राने ती गाडी फटाफट टर्न केली. पण ती गाडी ईतकी कंट्रोल बाहेर गेली की, ती स्किडच झाली आणि कुठल्या कुठे आम्ही जावून पडलो. बाजूला असलेल्या झाडीमुळे आम्ही वाचलो. पण देवाची कृपा आणि त्याने आम्हाला झेललं. आणि आम्हाला ही दिवाळी बघता आली. घरच्यांसाठी आवडीने घेतलेले गिफ्ट्स या अपघातानंतर मी जमा करत होतो. कधीही काहीही संपू शकतं हे आज समजलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे अजिंक्य म्हणाला की,  या अपघातानंतर एक गोष्ट शिकलो ती म्हणजे आयुष्यात कधीही काही होवू शकतं. पण तुमच्या प्रेमाने आणि आर्शिवादाने मी सुखरुप आहे. याचबरोबर ही घटना जेव्हा घडली तेव्हा अजून एक गोष्ट शिकलो ती म्हणजे कोणतच फेम महत्वाचं नसतं जेव्हा तुमच्यासमोर जीवघेणा प्रसंग असतो. पण या भयानक प्रसंगातून देवाने मला वाचवलं आहे. आता मी पुढच्या आयुष्यात चांगलं काम करेन याची मला अपेक्षा आहे.