Malaika Arora चा 'हा' नवा लूक सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Malaika Arora नं सोशल मीडियावर शेअर केलेले हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. मलायकाचे बोल्ड फोटो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 

Updated: Jan 15, 2023, 02:09 PM IST
Malaika Arora चा 'हा' नवा लूक सोशल मीडियावर होतोय व्हायरल title=

Malaika Arora Bold Photo : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही सोशल मीडियावर फोटो शेअर करत असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच मलायकाचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय सुरु ठरले आहेत. 

मलायकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मलायका मल्टी कलरचा ड्रेस परिधान केला आहे. या डीप नेक ड्रेसमध्ये मलायका खूप सुंदर दिसत आहे. 50 व्या वर्षी देखील मलायका इतकी सुंदर आहे हे पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य होतं. मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. मलायकाचे अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. (Malaika Arora Viral Video) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मलायकाचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस आला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, वयाच्या पंनाशीत मलायका तू उतकी सुंदर कशी दिसू शकते. दुसरा नेटकरी म्हणाला, व्वाव. अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे. (Malaika Arora Bold)

हेही वाचा : 'RRR बॉलिवूड चित्रपट नाही, तर तो...', S S Rajmouli यांच्या वक्तव्यानंतर Bollywood vs South वादाची ठिणगी

मलायका ही चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. मलायकाला 'छैया छैया' गर्ल म्हणून देखील लोक ओळखतात. सध्या मलायका तिचा शो 'मूव्हिंग इन विथ मलायका'मुळे (Moving In With Malaika) चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी मलायकाचा हा शो प्रदर्शित झाला होता. या शोच्या माध्यमातून मलायकाचे खासगी आयुष्य प्रेक्षकांना पाहायला मिळाले. अनेकांना तिचे आयुष्य पाहून आपरुप वाटले तर काही नेटकऱ्यांनी त्यावरूनही तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले होते. 

या शोमध्ये अरबाज खान (Arbaaz Khan) आणि मलायकाचा मुलगा अरहान दिसला होता. यावेळी त्या दोघ्यांची ली बॉंडिग दिसून येत आहे. ते एकत्र चांगलीच धमाल करत आहेत. अरहान हा अमेरिकेत फिल्म मेकिंगचे शिक्षण घेत आहे. सध्या तो भारतात आला आहे. अरबाज आणि मलायका 1998 साली लग्न बंधनात अडकले होते. लग्नाच्या 19 वर्षानंतर 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतरही मलायका आणि अरबाज अनेकदा त्यांच्या मुलासोबत स्पॉट झाले आहेत. मलायकानं घटस्फोटाच्या वेळी अरबाजकडून 15 कोटी रुपये पोटगी घेतली होती.