50 वर्षांची मलायका आहे सिंगल, अर्जुनशी झाला ब्रेकअप? फराह खानचा अभिनेत्रीच्या नात्यावर खुलासा

Farah Khan on Malaika Arora and Arjun Kapoor : फराह खाननं रिअॅलिटी शोमध्येच केला मलायका सिंगल आहे की नाही याचा खुलासा? व्हिडीओ होतोय व्हायरल

दिक्षा पाटील | Updated: Nov 26, 2023, 12:35 PM IST
50 वर्षांची मलायका आहे सिंगल, अर्जुनशी झाला ब्रेकअप? फराह खानचा अभिनेत्रीच्या नात्यावर खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Malaika Arora and Arjun Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या बोल्डनेससाठी आणि तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. मलायका ही तिच्या कामापेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. त्यातही ती बॉयफ्रेंड अर्जुन कपूरमुळे चर्चेत असते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरु होती. त्यात आता बॉलिवूडची लोकप्रिय दिग्दर्शिका फराह खाननं त्याच्या नात्याचं सत्य काय आहे ते सांगितलं आहे. याचा खुलासा फराहनं एका रिअॅलिटी शोमध्ये केला आहे. 

सध्या मलायका अरोरा, फराह खान आणि अभिनेता अरशद वारसी हे छोट्या पडद्यावरील झलक दिखलाजा या शोचे परिक्षक आहेत. त्या तिघांना परिक्षक म्हणून प्रेक्षकांनी देखील पसंती दिली आहे. चाहत्यांना स्पर्धकांच्या अप्रतिम पर्फॉमन्ससोबत प्रेक्षकांना परिक्षकांची मस्ती प्रचंड आवडली आहे. नुकताच शोच्या आगामी एपिसोडचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्रोमोमध्ये श्रीराम चंद्रा त्याच्या कोरिओग्राफरसोबतक बेबी बोल वर अप्रतिम डान्स करताना दिसतो. त्याचा पर्फॉर्मन्स झाल्यानंतर फराह श्रीराम चंद्राला विचारते की तुझी क्रश कोण आहे? त्यावर उत्तर देत श्रीराम चंद्रा बोलतो की मलायका मॅम. मलायका लगेच त्याला हातानं हार्ट करून दाखवते. त्यानंतर मलायका आणि श्रीराम चंद्रा बोलताना दिसतात. हे पाहताच फराह बोलते की मलायका सिंगल नाही आहे. यावर मलायका बोलते की हे तुला कसं माहित? त्यामुळे तिच्या फ्लर्ट तुझ्या रिस्कवर कर, असं देखील फराह श्रीराम चंद्राला बोलताना दिसते. मलायका आणि फराह या शोमध्ये जी मस्ती करतात ते पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 

फराहनं केला खुलासा

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फराहनं केलेल्या या वक्तव्यानं एक गोष्ट तर स्पष्ट झाली आणि ती म्हणजे मलायका ही सिंगल नाही. ती अजूनही अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. याचा अर्थ आता पर्यंत त्यांच्या ब्रेकअप विषयी जी माहिती येत होती ती खोटी होती. 

हेही वाचा : 'घटस्फोट झाल्यास ऐश्वर्याला पोटगी द्यावी लागेल म्हणून...', बिग बींनी घेतला हा निर्णय?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी चर्चा रंगली होती की मलायका ही अर्जुन कपूरच्या पहिल्या बाळाची आई होणार आहे. या चर्चांवर अर्जुन कपूर याने थेट संताप व्यक्त करत तो चांगलाच भडकलेला दिसला. त्या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा नेहमीच रंगताना दिसतात. मात्र, त्यावर त्यांनी कधीही प्रतिक्रिया दिलेली नाही.