'चार-पाच बॉयफ्रेंड असले तरी काय फरक पडतो'

अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) कायम तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते.

Updated: Mar 13, 2020, 12:03 PM IST
'चार-पाच बॉयफ्रेंड असले तरी काय फरक पडतो' title=

मुंबई : अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) कायम तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. ती नेहमीच तिचे स्पष्ट मत मांडत असते. पण आता तिची ही बेधडक वक्तव्य करण्याची सवय काही अंशी तिला महागात पडली आहे. स्पष्टपणे आपले विचार मांडणारी नेहा सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. सध्या ती रोडीज (Mtv Roadies)मध्ये परिक्षकाची बाकावर बसली आहे. 

रोडीज (Mtv Roadies) या शोमध्ये तिने एका स्पर्धकाला चांगलेच खडेबोल सुनावले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. 'माझ्या एक्सगर्लफ्रेंडचे पाच बॉयफ्रेंड होते. मला हे कळाल्यानंतर मी तिच्या कानशिलात लगावली.' असं या स्पर्धकाने शोदरम्यान सांगितले. 

स्पर्धकाने सांगितलेल्या किस्स्यानंतर नेहाने त्याला चांगलंच सुनावलं. ती म्हणाली, 'एका मुलीला मारण्याचा तुला अधिकार नाही. तिने पाच बॉयफ्रेंडची निवड करणं हा त्या मुलीचा निर्णय आहे.' नेहाच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी  तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. 

सध्या नुकताच नेहाने 'देवी' या लघुपटात भूमिका साकारली होती. नेहा चित्रपटांपासून दूर असली तरी अनेक शो किंवा कार्यक्रमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आसते. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर देखील नेहा कायम सक्रिय असते.