Juna Furniture Box Office Collection : मराठीतील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकरांना ओळखले जाते. महेश मांजरेकर दिग्दर्शित जुनं फर्निचर हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटातून ज्येष्ठ व्यक्तींची व्यथा मांडण्यात आली आहे. आता या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाने तीन दिवसात बक्कळ कमाई केली आहे.
महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित जुनं फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात आपले आई-वडील मुलांप्रती असलेली सगळी कर्तव्य चोख बजावतात; पण तीच सगळी कर्तव्यं आई-वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का? अशा अनेक प्रश्नांबद्दल यात उत्तरे देण्यात आली आहेत. या चित्रपटाला वृद्धांसह तरुणांचाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाने तीन दिवसात चांगली कमाई केल्याचे दिसून येत आहे.
sacnilk या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, जुनं फर्निचर या चित्रपटाने गेल्या तीन दिवसात दोन कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 40 लाखांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 77 लाखांची कमाई केली होती. यानंतर काल रविवारी तब्बल 1.02 कोटींची कमाई केली होती. त्यानुसार गेल्या तीन दिवसात या चित्रपटाची कमाई 2.19 कोटी इतकी झाली आहे. जुनं फर्निचर हा चित्रपट उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रदर्शित झाल्याने या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
दरम्यान सत्य - सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत 'जुनं फर्निचर' हा चित्रपट 26 एप्रिलला प्रदर्शित झाला. हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केले आहे. तर यतिन जाधव हे 'जुनं फर्निचर'चे निर्माते आहेत.
यात मेधा मांजरेकर यांनी महेश मांजरेकरांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर भूषण प्रधान हा महेश मांजरेकरांचा मुलगा अभय हे पात्र साकारत आहे. तर अभिनेत्री अनुषा दांडेकर ही यात मांजरेकरांच्या सूनेची भूमिका साकारताना दिसत आहे.