Mahesh Manjarekar Health Update : महेश मांजरेकर यांची Bladder Cancer सर्जरी

कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली आहे. 

Updated: Aug 23, 2021, 12:13 PM IST
Mahesh Manjarekar Health Update : महेश मांजरेकर यांची Bladder Cancer  सर्जरी  title=

मुंबई : कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली आहे. आता या कलाकारांच्या यादीत प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा देखील समावेश झाला आहे. महेश मांजरेकर  यांची नुकताचं एक सर्जरी झाली आहे. त्यांची ही सर्जरी पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. महेश युरिनरी ब्लॅडर कॅन्सरने ग्रस्त होते. नुकताचं त्यांची सर्जरी झाली असून ते आता सुखरूप घरी परतले आहेत. महेश मांजरेकर कॅन्सरच्या विळख्यात सापडले असल्याची माहिती चाहत्यांना मिळताचं त्यांनी चिंता व्यक्त केली. 

टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, '10 दिवसांपूर्वी मुंबईच्या एच.एन रिलायन्स रूग्णालयात त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली. आता दिग्दर्शक  घरी परतले आहेत. आजारावर मात केलेल्या महेश मांजरेकर यांना घरी आल्यावर चांगलं वाटत आहे.'  महेश मांजरेकर घरी आल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

महेश मांजरेकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी मराठी व्यतिरिक्त हिंदी आणि तामिळ चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. बॉलिवूडमध्ये त्यांनी 'कांटे', 'मुसाफिर', 'रन', 'दस कहानिया', 'दबंग' यां चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शिवाय त्यांनी अनेक टीव्ही शोमध्ये देखील आपली महत्त्वाची भूमिका बजावली आहे.