Namrata Sambherao and Vishakha Subhedar : ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज बरेद दिवस झाले आहेत. खरंतर चित्रपट 30 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली. चक्क थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्याची गर्दी केली होती. या चित्रपटाविषयी म्हणायचं झालं तर चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यानं सगळ्यांना वेड लावलं आहे. फक्त भारतात नाही तर परदेशातही या गाण्यावर लोक थिरकत असल्याचे आपण व्हिडीओ पाहत आहोत. काही दिवसांपूर्वी एका जपानी ग्रुपवर या गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून घराघरात पोहोचलेल्या नम्रता संभेराव आणि विशाखा सुभेदार यांनीही ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
नम्रता संभेरावनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत नम्रता, विशाखा आणि त्यांची एक सहकारी दिसत आहे. त्या तिघींनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. या गाण्याची हूक स्टेप करत त्यांनी खूप सुंदर डान्स केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ शेअर करत नम्रता म्हणाली, बहरला हा मधुमास नवा गाण्यावर निर्मात्यांसोबत रिल असं कॅप्शन दिलं आहेय
नम्रता आणि विशाखा या दोघीही त्यांच्या नाटकाच्या प्रयोगासाठी महिना भरापासून अमेरिकेत आहे. नम्रता आणि विशाखा या दोघांना या गाण्यावर डान्स करताना पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, अरे नम्रता ताई प्रसाद दादा आता या... तुमची खूप आठवण येते हास्यजत्रा बघताना. दुसरा नेटकरी म्हणाला, बाई लईच भारी. तिसरा नेटकरी म्हणाला, ताई तुझा डान्स म्हणजे लय भारी आहे. आणखी एक नेटकरी म्हणाला, वाह, क्या बात है. दुसरा नेटकरी म्हणाला, प्लीज नमु ताई लवकर या तुमचं स्कीट घेऊन... तुमची खूप आठवण येते. तिसरा नेटकरी म्हणाला, तिघीही बेस्ट डान्स करतात. आणखी एक नेटकरी म्हणाला, ताई समीर दादानं या पेक्षा चांगला डान्स केला आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, मधुमासच्या रीलचं गिनीज बुक मध्ये नोंद होईल. तिसरा नेटकरी म्हणाला, तुला आणि विशाखाला एकत्र पाहून खूप मस्त वाटलं.
हेही वाचा : उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यामुळं Govinda ची पत्नी अडचणीत, वाचा काय घडलं
दरम्यान, ‘महाराष्ट्र शाहीर’ हा केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी आणि सना शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.