मुंबई : बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' चित्रपट गेल्या दोन आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगलीच पसंती मिळतेय. आता महाराष्ट्र सरकारने 'मिशन मंगल' चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पाहावा यासाठी महाराष्ट्र सरकारकडून हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.
#MissionMangal declared tax-free [SGST] in #Maharashtra.
— taran adarsh (@taran_adarsh) August 28, 2019
हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक पालकांनी अक्षय कुमारचा हॅशटॅग वापरत, चित्रपट पाहिल्यानंतर कशाप्रकारे त्यांच्या मुलांना सोलर सिस्टम आणि मंगळ ग्रहाबाबत माहिती मिळाली याबाबतही सांगितलंय.
चित्रपटाने आतापर्यंत १६८ कोटींहून अधिक रुपयांचा गल्ला जमवला आहे.
#MissionMangal [Week 2] Fri 7.83 cr, Sat 13.32 cr, Sun 15.30 cr, Mon 3.87 cr. Total: 168.48 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) August 27, 2019
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी 'मिशन मंगल' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटात विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, कीर्ति कुल्हारी, शर्मन जोशी, नित्या मेनन, संजय कपूर आणि जीशान अयूब यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
जगन शक्ती यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
चित्रपटात अक्षय संशोधक राकेश धवन या मिशनच्या प्रमुखाची भूमिका साकारत आहे. इतिहासच्या पानांत सुवर्णाक्षरात नोंद झालेल्या देशाचा प्रेरणादायी अंतराळ प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.