नाहीतर 'ही' अभिनेत्री असती अनारकली, दिलीप कुमार यांच्या चुकीमुळे सगळंच फिसकटलं?

Madhubala Mughl - e - azam : सध्या चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री मधुबाला यांची. मुघल - ए - आझम हा चित्रपट प्रचंड गाजला होता. परंतु तुम्हाला माहितीये का की मधुबाला या या चित्रपटासाठी पहिली निवड नव्हती. चला जाणून घेऊया हा रंजक किस्सा 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 14, 2023, 04:24 PM IST
नाहीतर 'ही' अभिनेत्री असती अनारकली, दिलीप कुमार यांच्या चुकीमुळे सगळंच फिसकटलं? title=
madhubala was not the first actress but nargis was the first choice know what happend

Madhubala Mughl - e - azam : सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'मुघल ए आझम' या चित्रपटाची. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. आजही या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली असते. हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर चित्रपट आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की अनारकली म्हणून मधुबाला या रूपेरी पडद्यावर दिसल्या होत्या. परंतु त्यांच्या जागी कदाचित एक दुसऱ्या लोकप्रिय अभिनेत्री असत्या. चला तर मग जाणून घेऊया या नक्की काय असं झालं होतं? आपल्याला माहितीच आहे की 1960 च्या दशकात आलेला 'मुघल ए आझम' हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय ठरला होता.

त्यावेळी या चित्रपटानं वेगळीच बाजी मारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट मुळात कृष्णधवल होता त्यानंतर या चित्रपटाला कलरमध्येही दाखवण्यात आले. त्यामुळे त्यावेळी या चित्रपटातून करण्यात आलेल्या कलादिग्दर्शनाचा आणि सुंदर कपड्यांचा आणि खासकरून मधुबाला यांच्या सदाबहार सौंदर्याचा अनुभव घेता आला. 

समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की, चित्रपटाचे दिग्दर्शक के. आसिफ यांना दिलीप कुमार यांच्या जागी अभिनेत्री नर्गिस यांना कास्ट करायचे होते. त्यावेळी नर्गिस या सर्वात टॉपच्या अभिनेत्री होत्या. त्यातून त्यावेळी राज कपूर आणि नर्गिस यांची जोडीही गाजत होती. नर्गिस यांच्या अभिनयाचेही सर्वच जण फॅन्स होते. दिलीप कूमार यांचीही हीच इच्छा होती की नर्गिस यांनी हा रोल करावा. नर्गिसही आपल्याला मधुबाला यांच्या जागी दिसल्या असत्या परंतु दिलीप कूमार यांच्यामुळे मात्र हे शक्य झाले नाही. 

जर ही एक छोटीशी चूक झाली नसती तर नक्कीच नर्गिस या त्यांच्या या चित्रपटातल्या हिरोईन असत्या. चित्रपट जाणकार राजकुमार केसवानी यांचे पुस्तक गाजले आहे त्यात ते म्हणतात की, त्यावेळी दिलीप कूमार हे नर्गिस यांच्या प्रेमात होते. त्यातून नर्गिस यांना हेच कळून चुकले होते त्यामुळे त्यांनी दिलीप कूमार यांच्यापासून दूरी ठेवली होती. हलचल - या चित्रपटात त्या दोघांनी एकत्र काम केले होते. त्यावेळी दिलीप कूमार नर्गिस यांच्या जवळ जायचा प्रयत्न करत होते. यावरून नर्गिस आणि त्यांची आई जद्दन बाई फार नाराज होत्या. त्यामुळेच नर्गिस यांनी दिलीप कूमार यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. अशाप्रकारे मधुबाला या काही त्यांच्या पहिल्या पसंद नव्हत्या. असा एक किस्सा आहे.