'लव्ह लग्न लोचा' ची सौम्या अडकली लग्नाच्या बेडीत

झी युवावरील प्रसिद्ध मालिका लव्ह लग्न लोचातील सौम्या म्हणजेच अभिनेत्री अक्षया गुरव २३ मे रोजी DOP भूषण वाणी यांच्याशी विवाहबद्ध झाली. मुंबईमध्ये अक्षया  आणि भूषणचा  विवाहसोहळा पार पडला. महाराष्ट्रीय पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले. गेल्या काही महिन्यांपासून अक्षया  आणि भूषण हे रिलेशनशीपमध्ये होते.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 26, 2017, 05:37 PM IST
'लव्ह लग्न लोचा' ची सौम्या अडकली लग्नाच्या बेडीत title=

मुंबई : झी युवावरील प्रसिद्ध मालिका लव्ह लग्न लोचातील सौम्या म्हणजेच अभिनेत्री अक्षया गुरव २३ मे रोजी DOP भूषण वाणी यांच्याशी विवाहबद्ध झाली. मुंबईमध्ये अक्षया  आणि भूषणचा  विवाहसोहळा पार पडला. महाराष्ट्रीय पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले. गेल्या काही महिन्यांपासून अक्षया  आणि भूषण हे रिलेशनशीपमध्ये होते.
 
अक्षयाला लग्नाबद्दल विचारले असता ती म्हणाली  , "एका मित्राच्या घरी झालेली ओळख ते त्याच्यात आयुष्यभराचा जोडीदार मिळणे , हा प्रवास फारच सुंदर होता . भूषणचा काळजी घेण्याचा स्वभाव आणि माझ्यासाठी असलेला त्याचा वेडेपणा  आणि मुख्य म्हणजे  एकाच इंडस्ट्रीमध्ये असून सुद्धा त्याला माझ्या कामाचे महत्व  समजून घेणे आणि सपोर्ट करणे मला मनापासून भावले. " अक्षयाने नुकतेच तिचे मेहंदीचे , हळदीचे आणि लग्नाचे फोटो सध्या तिच्या सोशल मीडियावर अपलोड केले तेव्हा तिच्या फॅन्स ना याची न्यूज मिळाली.


 
अक्षया गुरव मराठी इंडस्ट्रीतील एक गुणी अभिनेत्री मराठी सिनेमा " फेकम फाक " मध्ये तिने काम केलं होत . त्याच बरोबर छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमधून ती झळकली होती. सध्या ती लव्ह लग्न लोचा या मालिकेमधे सौम्या ही भूमिका करत आहे. सध्या सुरु असलेल्या मालिकेच्या ट्रॅक मध्ये  तिने सुमितला अल्टिमेटम दिला असून सर्व मित्रांना सोडून तिच्याबरोबर मुंबईबाहेर यायला सांगत आहे. भूषणने रिलायन्स जिओ , सेव्हिलॉन , फ्लिपकार्ट या आणि अश्या अनेक जाहिरातींचे dop म्हणून काम सांभाळले आहे .