'...तरी मी लग्नात येऊन गाणार नाही', लता मंगेशकर यांनी नाकारलेली लाखो डॉलर्सची ऑफर

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांनी लग्नात गाण्याची लाखो डॉलर्सच्या ऑफरला दिला होता नकार...

दिक्षा पाटील | Updated: Mar 4, 2024, 01:18 PM IST
'...तरी मी लग्नात येऊन गाणार नाही', लता मंगेशकर यांनी नाकारलेली लाखो डॉलर्सची ऑफर title=
(Photo Credit : Social Media)

Lata Mangeshkar : गुजरातच्या जामनगरमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची गर्दी पाहायला मिळाली. त्याचं कारण ठरलं अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचं प्री-वेडिंग फंक्शन झालं. हे प्री-वेडिंग फंक्शन तीन दिवस सुरु होतं. फक्त भारतातील सेलिब्रिटी नाही तर परदेशातील अनेक मोठ्या दिग्ग्जांनी देखील यावेळी हजेरी लावली होती. यात काही गायक देखील होते. त्यात हॉलिवूडमधील लोकप्रिय पॉपस्टार रिहानापासून दिलजीत दोसांझ पर्यंत स्टेजवर परफॉर्म केलं. पण या सगळ्यामुळे अनेकांना गानकोकिळा लता मंगेशकर यांची आठवण आली आहे. लता मंगेशकर यांनी लग्नात गाणं गाण्यासाठी मिळत असलेल्या कोटींच्या रुपयांच्या ऑफरला नकार दिला होता. 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी डान्स आणि गाणी गायल्यानंतर अनेकांनी लता मंगेशकर यांची आठवण काढली आहे. लता मंगेशकर यांनी कधीच कोणत्या लग्नात परफॉर्म केलं नाही, मग त्यासाठी त्यांना कोटी रुपयांची ऑफरही मिळाली तरी सुद्धा. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याविषयी लोकप्रिय गायिका आणि लता मंगेशकर यांची बहीण आशा भोसले यांनी एका शोमध्ये सांगितलं होतं. आशा भोसले यांनी 'डांस इंडिया डांस लिटिल मास्टर सीजन 5' मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी याविषयी खुलासा केला होता. आशा भोसले म्हणाल्या होत्या की 'त्यांना एकदा लग्नात गाणं गाण्यासाठी एक मिलियन डॉलरची ऑफर मिळाली होती.' त्यावेळी त्यांनी सांगितलं की 'फक्त दोन तास दर्शन द्या. (याचा अर्थ फक्त दोन तास लग्नात हजेरी लावा.)' त्यावर उत्तर देत लता मंगेशकर म्हणाल्या होत्या की 'जर तुम्ही मला पाच मिलियन डॉलर दिले तरी मी येणार नाही.' 

या आधी आशा भोसले यांनी लता दीदींच्या अवॉर्ड शोमधील अशीच एक कहानी सांगितली होती. आशा भोसले म्हणाला, 'कोणीतरी आम्हाला लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. त्यांच्याकडे मिलियन डॉलर किंवा पाउंडची तिकिटं होती. त्यांनी म्हटलं की त्यांना आशा भोसले आणि लता मंगेशकर या दोघांनी परफॉर्म करावं अशी इच्छा व्यक्त केली. दीदीनं मला विचारलं, तू लग्नात गाणार का? मी म्हटलं की मी गाणार नाही आणि मग त्यांनी मॅनेजरला सांगितलं की जर तुम्ही 10 कोटी डॉलर ऑफर केले तरी आम्ही गाणार नाही, कारण आम्ही लग्नात गात नाही. तो व्यक्ती फार निराश झाला.'

हेही वाचा : 'तुम्हाला वडील म्हणायला लाज वाटते'; महाभारतात श्रीकृष्ण साकारलेल्या अभिनेत्याची खंत

ईशा अंबानी आणि आनंद पीरामलच्या लग्नासाठी लता मंगेशकर यांनी एक स्पेशल मेसेजसोबत गायत्री मंत्र आणि गणेश स्तुति रेकॉर्ड केलं होतं. त्यांची ही रेकॉर्डिंग ही गुजराती आणि हिंदू वैदिक पूजे दरम्यान, वाजवण्यात आली.