मुंबई : अभिनेता धर्मेंद्रने काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं. या ट्विटनंतर त्यांचे चाहते चिंता व्यक्त करत होते. त्यांनी त्याच्या ट्विटमध्ये ''शाहूर ना आया सादगी को मेरी उमर भर मैं सेहता आया...सेहता आया'' अशा आशयाचं ट्विट त्यांनी शेअर केलं होतं. हे ट्विट शेअर करताच धर्मेंद्र यांच्या फॅन्सला प्रश्न पडला आहे की, ते कोणत्या कारणांमुळे ऐवढे उदास आहेत.
धमेंद्र यांच्या या ट्विटमुळे गायिका लता मंगेशकर यांना देखील त्यांची चिंता वाटू लागली. लता दिदी यांनी धर्मेंद्र यांना फोन करुन जवळजवळ त्यांच्यासोबत २० मिनिट गप्पा मारल्या. एका दिलेल्या मुलाखतीमध्ये धर्मेंद्र यांना लता दिदींनी केलेल्या फोनविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.
यावर ते म्हणाले, गेलं वर्ष कुणासाठी तेवढं खास न्हवतं, मला माझ्या परिवाराने गर्दीपासून लांब फार्महाऊसवर रहायला सांगितले. यावेळत मी एक्ससाईज केली, कविता लिहिल्या, लता दिदींची गाणी ऐकत, माझा वेळ घालवायचो. नुकताचं मी त्यांच्यासोबत जवळजवळ २० मिनिटं गप्पा मारल्या. लता दीदी माझ्या खूप जवळच्या व्यक्ती आहेत. लॉकडाऊनमध्ये मला त्यांच्या गाण्यांनी हिम्मत दिली. त्या साक्षात देवी सरस्वती आहेत.
धर्मेंद्र यांनी लता मंगेशकर यांच्या कॉलविषयी सांगितलं ते म्हणाले, जेव्हा त्यांनी माझे प्रॉब्लेम्स जाणून घेण्यासाठी मला फोन केला तेव्हा, माझा सगळा नरवसपणा दूर गेला. लता दिदींनी मला सांगितलं की, आपल्या शत्रूला उदार करा, त्यांचे माझ्यावरचे प्रेम आणि त्याच्याविषयी माझे प्रेम आहे हे सशर्त आहे. देव त्यांना कायम खुश ठेवो. धर्मेंद्र यांच्या या बातचितवरुन या दोघांचं खूप चांगलं बाँडिंग आहे हे नक्की.
धर्मेंद्र यांनी आपल्या या ट्विटबद्दल सांगितलं, माझ्या आत एक सुंदर कवी आहे. ज्यात, संवेदनशीलता आहे. मी लगेच ईमोशनल होतो. मी खूप भावूक आहे. मी माझ्या याच स्वभावामुळे बरेच सिनेमेदेखील सोडले आहेत. मी एक चांगला एक्टरपेक्षाही एक चांगला माणूस राहण्याला पसंती देतो. मी खूप नशीबवान आहे. देवाने मला माझ्या आयुष्यात खूप प्रेम करणारी माणसं दिली. जिथे पण जातो तिथे मला खूप प्रेम मिळतं.