अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरात मोलकरणीनेच साफ केले हात, लाखोंचा ऐवज घेवून झाली पसार

क्रांती रेडकरच्या चाहत्यांची मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीच्या घरात काम करणाऱ्या महिलेनेच लाखोंचा गंडा घातला आहे. क्रांतीच्या घरात मोलकरणीने चोरी करुन ती फरार झाली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. 

Updated: Jan 7, 2023, 05:29 PM IST
अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरात मोलकरणीनेच साफ केले हात, लाखोंचा ऐवज घेवून झाली पसार title=

मुंबई : मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर (marathi actress kranti redkar ) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियावर स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती प्रेक्षकांचं नेहमी मनोरंजनही करत असते. लग्नांनंतर अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून बराच काळ दूर होती मात्र क्रांती पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत झाली आहे. नुकतंच क्रांती रेडकरच्या आगामी 'रेनबो' सिनेमाच्या शूटिंग पार पडलं. गेल्यावर्षी आर्यन खान (aryan khan drugs case ) ड्रग प्रकरण चांगलंच गाजलं होतं. या केसवर काम करणारे आणि याचा तपास करणारे अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) आणि त्यांची पत्नी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर या प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत (mumbai crime) आली होती. 

 क्रांती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र यावेळी क्रांती रेडकर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार क्रांती रेडकरच्या घरात मोठी चोरी झाली आहे. यामध्ये अभिनेत्रीच्या घरातील मौल्यवान वस्तू लंपास झाल्या आहेत. यामध्ये साडेचार लाखाच्या हातातील घडयाळ चोरीला गेल्याचं समोर आलं आहे. मुंबईच्या गोरगाव पोलिस स्थानकात नुकतंच याविषयी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

घरात काम करणाऱ्या एका मोलकरीणीने ही चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेले बरेच दिवस ती मोलकरीण अभिनेत्रीच्या घरी काम करत होती.  बरेच दिवस त्यांना तिच्यावर शंकाही होती. या चोरीनंतर मोलकरीण पसार झाल्याचंही स्पष्ट झालं आहे. यामुळेच तिच्यावर संशय घेत ही चोरी तिनेच केल्याचा आरोप क्रांतीने  केला आहे. क्रांतीच्या तक्रारीच्या आधारावर पोलिस तपास करत आहेत आणि त्या मोलकरणीला ज्या संस्थेने नोकरी दिली होती तिचा तपास सुरू आहे.

खरंतर साडेचार लाखाचं हे घडाळ काही दिवसांपुर्वीच चोरीला गेलं होतं. मात्र ही बाब खूप उशिरा लक्षात आल्याचं अभिनेत्रीने तक्रारीत म्हटलं आहे. क्रांतीने ५ जानेवारीला ही तक्रार नोंदवली असल्याचं सांगण्यात येत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नंतर या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं आणि क्रांती रेडकरच्या पतीवर बरेच आरोप करण्यात आले. आता पुन्हा क्रांती चर्चेत आहे. यावेळी कारण मात्र वेगळं आहे. मोलकरीण उत्तर प्रदेशला गेल्याने मुंबई पोलिस (mumbai police) तिला पकडण्यासाठी उत्तर प्रदेशकडे रवाना झाले आहेत. आता या संपूर्ण प्रकरणात पुढे नेमकं काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x